स्पर्धा परीक्षांमधून अनेकांचे आयुष्य बदलते, पण यामागे अपार मेहनत,(willpower)संयम आणि ठाम इच्छाशक्ती असते. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्याचा रहिवासी सूरज यादव याची कहाणी ही त्याचं उत्तम उदाहरण आहे. सूरजने झारखंड लोकसेवा आयोग ची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पद मिळवलं आहे. पण या यशामागे त्याचा संघर्ष आणि धडपड सामान्य तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
कठीण परिस्थितीत वाढलेला सूरज सूरज एका गरीब कुटुंबात जन्मला. त्याचे वडील मजुरीचे काम करत आणि आई घर चालवण्यासाठी त्यांना मदत करत असे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी कमकुवत होती की शैक्षणिक खर्च भागवणंही कठीण होतं.(willpower)या अडचणींमध्येही सूरजने अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं. त्याने रांचीमध्ये राहून अभ्यास सुरू केला. पण घरून आर्थिक मदत न मिळाल्यामुळे त्याला स्वतःच्या कष्टावर खर्च भागवावा लागला.

अभ्यासासोबत डिलिव्हरी बॉयचे काम परीक्षेची फी, पुस्तकं आणि राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी सूरजने Swiggy मध्ये डिलिव्हरी बॉय आणि Rapido मध्ये बाईक टॅक्सी चालक म्हणून काम केलं. सुरुवातीला त्याच्याकडे स्वतःची बाईक नव्हती. या वेळी त्याचे मित्र राजेश नायक आणि संदीप मंडल पुढे सरसावले. त्यांनी शिष्यवृत्तीच्या पैशातून सूरजसाठी एक जुनी बाईक खरेदी करून दिली. त्या बाईकवर तो रोज ४–५ तास काम करायचा आणि उरलेला वेळ अभ्यासाला देत असे.
कुटुंबाची साथ सूरजच्या यशामध्ये त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडिलांनी नेहमीच मेहनत आणि प्रामाणिकपणाचं बळ दिलं. बहिणीने घरातील सर्व जबाबदाऱ्या घेतल्या जेणेकरून सूरज निश्चिंतपणे अभ्यास करू शकेल. पत्नीने मानसिक आधार देत पतीला कधीच खचू दिलं नाही.(willpower)या सामूहिक संघर्षामुळेच सूरजने आपल्या परिस्थितीवर मात करत मोठं स्वप्न पूर्ण केलं.

दुसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश झारखंड लोकसेवा आयोगाची संयुक्त नागरी सेवा मुख्य परीक्षा 2023 ही २२ ते २४ जून २०२४ दरम्यान झाली होती. यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जवळपास दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर निकाल जाहीर झाला आणि त्यात सूरजने ११० वा क्रमांक मिळवला.
ही त्याची दुसरीच वेळ होती. पहिल्या प्रयत्नात यश न मिळालं तरी त्याने हार मानली नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्याने प्रचंड मेहनत घेऊन हे यश आपल्या नावावर केलं.
समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून उपजिल्हाधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास हा सामान्य नाही. सूरजची कथा हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. त्याच्या संघर्षाने हे सिद्ध केलं की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी चिकाटी, मेहनत आणि धैर्य असेल तर स्वप्न पूर्ण करता येतात.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय