महाराष्ट्र पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील! १५,६३१ पदांसाठी प्रक्रिया सुरू(recruitment) होणार शिपाई ते कारागृह शिपाईपर्यंत जागांचा तपशील जाहीर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची जोरदार मागणी होत होती. हजारो तरुण-तरुणी पोलीस दलात भरती होण्यासाठी अभ्यास आणि शारीरिक तयारी करत होते. अखेर त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्य सरकारने पोलीस दलातील तब्बल १५,६३१ पदांसाठी भरती करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. यामुळे पोलिस दलात रुजू होण्याची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

१५,६३१ पदांची मोठी भरती – कोणत्या पदांसाठी किती जागा? सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या आदेशानुसार, पोलीस दलातील विविध पदं शंभर टक्के भरण्यात येणार आहेत. (recruitment)या रिक्त पदांमध्ये जानेवारी २०२४ पासूनची सर्व जागा समाविष्ट आहेत. त्यात खालीलप्रमाणे जागांचा तपशील आहे:

पोलीस शिपाई : १२,३९९ जागा
पोलीस शिपाई चालक : २३४ जागा
बॅण्ड्समन (Bandsman) : २५ जागा
सशस्त्र पोलीस शिपाई : २,३९३ जागा
कारागृह शिपाई : ५८० जागा

या सर्व पदांसाठी लवकरच औपचारिक भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांना मोठ्या संख्येने रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय आणि शासन आदेश १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरु झाली आणि अखेर आता शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर भरतीसंदर्भातील वेळापत्रक, परीक्षा प्रक्रिया आणि नोटिफिकेशन लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

तरुणांसाठी सुवर्णसंधी राज्यात पोलीस दलात सेवा करण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहतात. त्यामुळे ही भरती प्रक्रिया हजारो उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. (recruitment)यानिमित्ताने केवळ रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत, तर पोलिस दलातील कार्यक्षमता आणि मनुष्यबळातही मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

उमेदवारांना आवाहन भरतीची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच उमेदवारांनी तयारी अधिक जोमाने सुरु करावी, असं सरकारकडून आवाहन करण्यात आलं आहे. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे आधीपासून तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर पोलीस दलातील रिक्त जागा भरल्या जात असल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *