इचलकरंजी │ इचलकरंजी महानगरपालिकेने शहरभर स्वच्छता आणि (implemented) सुशोभीकरणाच्या मोहिमा राबवली आहे. मात्र, महापालिकेच्या स्वतःच्या कार्यालयातच अस्वच्छतेचे चित्र दिसत आहे. कार्यालयाच्या आवारात पिचकाऱ्यांनी मारलेले डाग आणि अस्ताव्यस्त कचरा यामुळे परिसर विद्रुप झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

ज्याठिकाणी नागरिकांना आदर्श घ्यावा असे वातावरण असायला हवे, त्याच ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसत असल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. शहरातील मुख्य प्रशासकीय इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिका कार्यालयाचे हे दृश्य प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महानगरपालिकेने कार्यालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडली नाही तर बाहेरील स्वच्छता मोहिमेचा उपयोग नाही, असे अनेकांचे मत आहे. (implemented)काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर लक्ष घालून तत्काळ स्वच्छता करण्यात यावी आणि सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्यांचा वापर करून विद्रुप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना(implemented) स्वच्छतेत सहभागी होण्याचे आवाहन केले असले तरी, कार्यालयातीलच हे दृश्य पाहून “स्वच्छ महानगरपालिका” या मोहिमेच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
अनैतिक संबंधाच्या संशयातून संताप; नवऱ्याने जावयाच्या मुलाचा गुप्तांग तोडला
Oppo F31 सीरीज भारतात लाँच होणार, वाचा फीचर्स आणि किंमत
पतीची हत्या करून ड्रममध्ये ठेवला मृतदेह, पत्नीने प्रेयसीसोबत केली पलायन