मुंबईतली मोनोरेल सेवा सुरू झाल्यापासून सतत वादग्रस्त ठरत आली आहे.(controversy) प्रवासी मिळत नाहीत, गाड्या वेळेवर धावत नाहीत, वारंवार बिघाड होतात आणि व्यवस्थापनाकडून योग्य देखभाल होत नाही अशा अनेक कारणांमुळे मोनोरेलला मुंबईकरांचा विश्वास अजूनही पूर्णपणे मिळालेला नाही. मात्र, गेल्या मंगळवारी झालेल्या मोठ्या बिघाडानंतर प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवे नियम लागू केले आहेत.
गर्दीमुळे बिघाड, प्रवाशांचा जीव टांगणीला पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याने नेहमी रिकामी धावणारी मोनोरेल अचानक प्रवाशांनी गच्च भरली. सायंकाळी चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान धावणारी मोनोरेल क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्याने बंद पडली. जवळपास दीड तास दोनशेहून अधिक प्रवासी आत अडकले होते. (controversy) अखेरीस अग्निशमन दलाच्या मदतीने सर्वांची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर एमएमआरडीएने मान्य केले की क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने गाडी बिघडली.

प्रशासनाचा निर्णय : ‘मर्यादित प्रवासीच’ या घटनेनंतर आता गर्दीच्या वेळी मोनोरेलमध्ये मर्यादित प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सुरक्षा रक्षकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजेच ठराविक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत चढणार नाहीत, आणि प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून मगच गाडी पुढे सोडली जाईल.
अंशकालीन उपाययोजना
प्रवासी नियंत्रण: मोनोरेलची कमाल क्षमता १०४ टनांपर्यंत आहे. त्यामुळे प्रत्येक डब्यात ठराविक प्रवाशांपेक्षा अधिक प्रवासी चढू दिले जाणार नाहीत. अधिकारी आणि सुरक्षारक्षक यावर कडक लक्ष ठेवतील.
अधिक कर्मचारी:आता प्रत्येक मोनोरेलमध्ये एक सुरक्षा रक्षक आणि एक टेक्निशियन सोबतच असणार आहे. ते आतल्या गर्दीवर लक्ष ठेवतील तसेच तांत्रिक अडचणींना तत्काळ प्रतिसाद देतील.
आपत्कालीन खिडक्यांची तपासणी:चार डब्यांच्या मोनोरेलमध्ये एकूण आठ आपत्कालीन व्हेंटिलेशन खिडक्या आहेत. त्यांची तातडीने तपासणी व स्पष्ट लेबलिंग सुरू आहे, जेणेकरून आपत्कालीन प्रसंगी प्रवासी योग्य मार्गाने बाहेर पडू शकतील.
सूचना फलक: गाड्यांमध्ये प्रवाशांना काय करावे याबाबत स्पष्ट व ठळक सूचना फलक बसवले जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत भीती न बाळगता योग्य दिशा मिळावी, हा यामागचा उद्देश आहे.
तपासणी मोहिम: मोनोरेलच्या सर्व गाड्यांची तातडीने तपासणी सुरू आहे. देखभाल व सुरक्षितता नियम काटेकोरपणे पाळले जातील याची खात्री केली जात आहे.

दीर्घकालीन उपाययोजना मोनोरेलसाठी नवे १० रेक मागवण्यात आले आहेत. त्यापैकी ७ गाड्या आधीच डेपोमध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या त्यांची तपासणी व ट्रायल सुरू आहे. ट्रायल यशस्वी झाल्यानंतर सर्टिफिकेशन पूर्ण होईल आणि गाड्या नियमित सेवेत दाखल होतील. या नव्या रेकमुळे मोनोरेलची प्रवासी क्षमता वाढेल आणि जुन्या गाड्यांवरील ताण कमी होईल.
मोनोरेल ही मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाकांक्षी योजना होती, पण सुरुवातीपासून तिचं व्यवस्थापन अनेक प्रश्नचिन्हांखाली राहिलं. आता मात्र प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने (controversy) तातडीचे आणि दीर्घकालीन उपाय हाती घेतले आहेत. या उपाययोजना खऱ्या अर्थाने अंमलात आल्यास मोनोरेलवर प्रवाशांचा विश्वास पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय