उत्तर कोरियाच्या हुकूमशहा किम जोंग उन यांची धाकटी बहीण किम जोंग यो पुन्हा (spotlight) एकदा चर्चेत आली आहे. बराच काळ शांत राहिल्यानंतर गेल्या काही आठवड्यांत ती सलग वक्तव्य करत असून तिच्या आक्रमक भाषेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेला व दक्षिण कोरियाला थेट धमक्या देत तिने स्पष्ट केले की उत्तर कोरिया कधीही झुकणार नाही.
२३ दिवसांत तीन तीव्र विधानं केवळ २३ दिवसांच्या कालावधीत किम जोंग यो हिने तीन वेळा अमेरिकेला व दक्षिण कोरियाला लक्ष्य केले. तिच्या या आक्रमक भूमिकेमागे अनेक कारणे दडलेली आहेत, असे तज्ज्ञ मानतात.
२८ जुलैचं विधान – किंमत चुकवावी लागेल किम जोंग यो हिने पहिल्याच भाषणात अमेरिकेला व दक्षिण कोरियाला इशारा दिला. “अमेरिकेने उत्तर कोरिया अण्वस्त्रधारी देश आहे हे मान्य करावं, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही,(spotlight) ” असं तिने ठामपणे सांगितलं. तसेच दक्षिण कोरियातील अमेरिकन लष्करी सरावांवर तीव्र टीका करताना “याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल” असं थेट आव्हान दिलं.

१४ ऑगस्टचं विधान – शांतता चर्चेला नकार यावेळी तिने दक्षिण कोरिया थेट लक्ष्य केला. “दक्षिण कोरिया आमच्याविरुद्ध खोटा प्रचार करत आहे. त्यांच्यासोबत शांततेबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही,(spotlight) ” असं स्पष्ट सांगत तिने चर्चेची सर्व दारे बंद केली. लाऊडस्पीकर काढून टाकल्याचा दक्षिण कोरियाचा दावा तिने खोटा ठरवला.
२० ऑगस्टचं विधान – लष्करी सरावांचा निषेध तिसऱ्या विधानात किम जोंग योने अमेरिकेच्या व दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावाचा निषेध केला. “उत्तर कोरियाच्या डिप्लोमेसीत सियोलची कोणतीही भूमिका नाही आणि राहणारही नाही,” असं तिने जाहीरपणे सांगितलं.
किम जोंग यो इतकी सक्रिय का झाली? किम जोंग उन आजारी पडल्यावर २०१४ मध्ये काही काळ देशाची सूत्रे जोंग योने हाताळली होती. २००७ मध्ये फक्त १७ वर्षांची असताना ती राजकारणात दाखल झाली होती. त्यानंतर बराच काळ ती पडद्यामागे राहिली. मात्र अलीकडील काळात तिच्या सलग आक्रमक विधानांनी तिची राजकीय भूमिका आणि महत्व पुन्हा एकदा पुढे आलं आहे.
उत्तराधिकाराचा प्रश्न आणि कुटुंबातील सत्तासंघर्ष उत्तर कोरियात किम कुटुंबाच्या उत्तराधिकाराचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला आहे. किम जोंग योला दीर्घकाळ भावाचा उत्तराधिकारी मानलं जात होतं. पण अलीकडेच किम जोंग उन यांनी आपल्या १४ वर्षांच्या मुलीला सार्वजनिक कार्यक्रमात आणून राजकारणात सक्रिय केले.

त्यामुळे जोंग योच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, भाचीचा उदय हा जोंग योसाठी मोठं आव्हान आहे. त्यामुळेच तिने पुन्हा मंचावर येत अमेरिकेविरुद्ध व दक्षिण कोरियाविरुद्ध तीव्र भूमिका घेतली आहे. तिच्या या हालचाली उत्तराधिकाराच्या राजकारणाशी जोडल्या जात असल्याचं विश्लेषक म्हणतात.
पुढील दिशा काय? सध्या जोंग योच्या विधानांनी अमेरिकन आणि दक्षिण कोरियन सरकारमध्येही खळबळ उडवली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही आक्रमक भाषा केवळ धमकी न राहता उत्तर कोरियाच्या सत्तासंघर्षाचा एक भाग आहे. उत्तर कोरियात सत्ता नेमकी कोणाच्या हातात जाईल – किम जोंग योच्या की तिच्या भाचीच्या – हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय