ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात टी 20 आणि (match) वनडेनंतर एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. जाणून घ्या.

भारतीय महिला संघाने इंग्लंड दौऱ्यात हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने यजमान इंग्लंडचा टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत पराभव केला. (match) त्यानंतर इंडिया ए वूमन्स टीम राधा यादव हीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना झाली. मात्र राधा यादव हीच्या नेतृत्वात वूमन्स इंडिया ए संघाने निराशा केली. ऑस्ट्रेलिया ए वूमन्स टीमने भारताचा टी 20 मालिकेत धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलिया ए वूमन्स टीमने भारताला 3 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने पराभूत केलं. मात्र त्यानंतर महिला ब्रिगेडने जोरदार कमबॅक केलं.

वूमन्स ए इंडियाने सलग 2 दोन्ही वनडे सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. त्यामुळे भारताकडे सलग तिसरा सामना जिंकण्यासह विजयी हॅटट्रिक करुन टी 20 सीरिजमधील पराभवाची परतफेड करण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात भारताला 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभूत केलं आणि विजय हॅटट्रिक करण्यापासून रोखलं. मात्र त्यानंतरही भारताने ही मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली.

त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया ए वूमन्स विरुद्ध इंडिया ए वूमन्स यांच्यात 4 दिवसांची अनऑफशियल टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. हा सराव सामना असणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया ए वूमन्स विरुद्ध इंडिया ए वूमन्स 4 दिवसीय सामना कधी?
ऑस्ट्रेलिया ए वूमन्स विरुद्ध इंडिया ए वूमन्स 4 दिवसीय सामना 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया ए वूमन्स विरुद्ध इंडिया ए वूमन्स 4 दिवसीय सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया ए वूमन्स विरुद्ध इंडिया ए वूमन्स 4 दिवसीय सामना ब्रिस्बेनमधील एलन बॉर्डर फिल्ड येथे आयोजित करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया ए वूमन्स विरुद्ध इंडिया ए वूमन्स 4 दिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया ए वूमन्स विरुद्ध इंडिया ए वूमन्स 4 दिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरुवात होईल. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

राधा यादव हीच या सामन्यातही भारताचं नेतृत्व करणार आहे. तर ताहिला विल्सन ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. भारताचा हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर कांगारु भारताला रोखण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या सामन्यात उभयसंघात 4 दिवस चढाओढ पाहायला मिळू शकते.

हेही वाचा :

आज शेवटचा श्रावणी गुरूवार दत्तकृपेने मिळेल यश

Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?

Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *