माझा भाऊ कुणालाही मारतो, जेवण करत नाही. गाड्यांचा काचा फोडतो.(windows)बाबा वारल्यापासून जास्त करत आहे.कुठेतरी दवाखान्यात नेऊन टाकावं, असं आम्हाला वाटतं.घरी काही खाऊ देत नाही, पसारा फेकून देतो.माझ्या बहिणीच्या मुलालाही मारलं आहे असे मनोरुग्णाच्या बहिणी सांगितले आहे.गाड्यांच्या काचा फोडतो, लहान मुलांना मारतो, म्हणून मनोरुग्ण मुलाला आईनेच शेतात बांधले
गावातील लहान मुलांना मारणे, गाड्यांच्या काचा फोडणे अशा प्रकारांना कंटाळून एका वृद्धेने आपल्या तरुण मनोरुग्ण मुलालाच सहा महिन्यांपासून शेतातील पत्र्यांच्या शेडमध्ये डांबल्याचे मन हेलावून टाकणारे प्रकरण उघडकीस आले आहे. (windows)या पोटच्या मुलाला अशा प्रकारे यातनादायी परिस्थितीत राहावे लागत असल्याने या मातेने सरकारकडे मदतीची आर्त हाक दिली आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील वाकद गावातील लक्ष्मीबाई वागतकर यांचा तरुण मुलगा पांडुरंग वागतकर हा मनोरुग्ण असून तो गावातील लहान मुलांना मारतो. तसेच गाड्यांच्या काचा फोडतो अशा रोजच्या तक्रारींना कंठाळून मनावर दगड ठेवून त्यांनी त्याला अखेर आपल्या शेतातील एका शेड्समध्ये बांधून ठेवले आहे. त्या स्वत: या मुलाच्या भरणपोषणासाठी तीन किमी चालत जाऊन तुटपुंजी कमाई करतात. आपल्या या मुलावर त्यांनी नांदेड आणि पुणे येथे उपचार करुन करुन देखील काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी अखेर अशा प्रकारे त्याला बांधून ठेवण्याचे टोकाचे पाऊल उचलले.
गेल्या सहा महिन्यांपासून पांडुरंग अशा अवस्थेत असल्याने त्याच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत आणि त्याची ही अवस्था पाहून आईचं काळीज पिळवटून निघत आहे. (windows)प्रशासनाने आता तरी याची दखल घ्यावी आणि त्याच्यावर योग्य उपचार करावेत अशी त्यांची कळकळीची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेनंतर प्रशासकीय उदासीनताही समोर आली आहे. गावचे सरपंच विकास वाकेकर यांनी जिल्हाधिकारी आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन या मायलेकरांना मदतीचा हात देणं अत्यंत गरजेचं आहे असे म्हटले आहे. मनोरुग्ण ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. एक आई आपल्या मुलासाठी अशाप्रकारे हतबल झालेली आहे, हे समाजासाठी एक आव्हानच आहे.

माझा मुलगा गेली पाच-सहा वर्षं झाली त्रास देत आहे. आमचीही नरडी दाबतो, स्वयंपाक केलेला फेकून देतो.घरात चूल पेटू देत नाही नाही, पाणी टाकतो. गॅसची टाकी आणि घरातला पसारा फेकून देतो.घरात झोपू देत नाही, म्हणून आम्ही दुसऱ्यांच्या घरात जाऊन झोपतो. दगड मारतो. आम्ही मोलमजुरी करून खातो. रोज याला येऊन जेवण देतो. सहा महिने झाले, बांधून ठेवलं आहे. जेवण केलं तर करतो, नाहीतर फेकून देतो अशी कैफियत त्याची आई लक्ष्मीबाई वागतकर यांनी मांडली आहे.आरोग्य विभाग आणि सामाजिक संस्थेला बोलून या तरुणाला मदत करण्यात येणार असल्याचे नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची म्हटले आहे.
हेही वाचा :
महिलांनी कधीच करू नयेत या 4 चुका नाहीतर कुटुंबाची लागेल वाट!
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ धोक्यात! वेरूळच्या लेण्यांमध्ये पाणी गळती; जैन गुहा क्रमांक 32 मध्ये…
प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य