आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकाच(century) खेळाडूने एकदिवसीय आणि टी20 दोन्ही स्वरूपात शतक झळकावले आहे.

आशिया कप 2025 पुढील महिन्यात 9 सप्टेंबरपासून सुरू (century) होणार आहे. यावेळी ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जाईल. युएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या 17 व्या आवृत्तीचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.
आशिया कपचा इतिहास मोठा आहे, पण टी20 फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचे आतापर्यंत केवळ दोनच आवृत्ती झाल्या आहेत. पहिल्यांदा 2016 मध्ये आणि त्यानंतर 2022 मध्ये टी20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा फॉरमॅट निवडण्यात आला होता.
आता तिसऱ्यांदा आशिया कप टी20 स्वरूपात रंगणार (century) आहे. मात्र, या स्पर्धेत आजवर फक्त दोनच फलंदाजांना शतक ठोकण्यात यश आलं आहे.
या वेळेस आशिया कपमध्ये तब्बल 8 संघ भाग घेत आहेत. 9 सप्टेंबरपासून स्पर्धेचा शुभारंभ होणार असून आगामी टी20 विश्वचषक लक्षात घेऊनच हा फॉरमॅट ठेवण्यात आला आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसारखे तडाखेबाज खेळाडू संघात असले तरी,आशिया कप टी20 च्या इतिहासात आजवर फक्त दोनच शतकं झळकली आहेत.
आशिया कप एकदिवसीय स्वरूपात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. जयसूर्याने आशिया कप एकदिवसीय स्वरूपात एकूण 6 शतके झळकावली आहेत.
2016 मधल्या पहिल्याच एशिया कप टी20 मध्ये हाँगकाँगच्या बाबर हयातने ओमानविरुद्ध केवळ 60 चेंडूत 122 धावा ठोकत शतकांचा पहिला विक्रम नोंदवला होता. त्यानंतर बराच काळ या यादीत दुसरं नाव जोडलं गेलं नव्हतं.
2022 मध्ये पुन्हा आशिया कप टी20 खेळला गेला आणि या वेळी अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी करत दुसरं शतक झळकावलं. विशेष म्हणजे, विराटच्या कारकिर्दीतील टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे एकमेव शतक ठरलं.
आता या वर्षी कोणता खेळाडू शतक ठोकतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील. भारतीय संघातील तरुण सलामीवीर अभिषेक शर्मा अलीकडे ज्या पद्धतीनं धडाकेबाज फलंदाजी करत आहे, त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून शतकाची मोठी अपेक्षा असेल.
हेही वाचा :
अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
इंजिनियरिंग केलं; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा