दक्षिण आफ्रिका मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. (series)त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी दुसरा सामना आर या पार असा आहे.

ऑस्ट्रेलियाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात पराभूत करत टी 20I मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 3 सामन्यांच्या(series) मालिकेत 2-1 अशी मात केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कांगारुंचा 98 धावांनी धुव्वा उडवत मालिकेत विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे दुसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरो असा आहे. उभयसंघातील दुसरा सामना कुठे आणि कधी होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना केव्हा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना शुक्रवारी 22 ऑगस्टला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना मॅकेतील ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे आयोजित करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओस्टार एपवरुन लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया पहिल्या पराभवाची परतफेड करणार?
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नव्हतं. दक्षिण आफ्रिकेने कांगारुंना 297 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेने कांगारुंना 40.5 ओव्हरमध्ये 198 धावांवर गुंडाळलं आणि 98 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
कोण जिंकणार?
त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेकडे 22 ऑगस्टला सलग दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियासमोर विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
हेही वाचा :
आज श्रावणातील शेवटचा दिवस राशींसाठी भाग्यशाली!
Maruti Suzuki Fronx Automatic खरेदी करण्याचा प्लॅन?
‘या’ पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ