ही अभिनेत्री 21 ऑगस्ट रोजी तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. काही वर्षांपूर्वी तिने शोबिझ जगाला कायमचा निरोप दिला आणि आता ती दोन मुलांची आई आहे. अभिनय सोडूनही ती आज कोटींची मालकिण असून लक्झरी आयुष्य जगते.
बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री (actress)आहेत ज्यांनी स्टारडम मिळवूनही ग्लॅमरस जग सोडले. काही जणी काळाच्या ओघात चाहत्यांच्या आठवणीतून पुसट झाल्या, तर काही आजही सोशल मीडियावरून चाहत्यांशी संपर्क ठेवून आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे सना खान.

सनाने आपल्या करिअरच्या शिखरावर असताना अचानक इंडस्ट्रीला रामराम ठोकला. ‘जय हो’ चित्रपटात सलमान खानसोबत तिची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. याशिवाय बिग बॉस सारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही ती चर्चेत आली होती. कमी वेळातच तिने इंडस्ट्रीत आपली वेगळी छाप पाडली होती. पण अचानक एका दिवशी सना बॉलिवूडपासून कायमची दूर झाली.
2020 मध्ये सनाने मौलाना मुफ्ती अनस सय्यद यांच्याशी साध्या पद्धतीने लग्न केले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांना मोठे आश्चर्य दिले होते. लग्नानंतर तिने इंडस्ट्रीपासून संपूर्ण अंतर ठेवले तसेच हिजाब आणि बुरख्याचा स्वीकार करत एक नवे जीवन जगण्यास सुरुवात केली.
चित्रपटांत काम करत असताना सनाला एका चित्रपटासाठी जवळपास 50 लाख मानधन मिळत असे. अभिनय सोडल्यानंतरही तिच्या आलिशान जीवनशैलीत फरक पडला नाही. ती आता व्यवसायिक महिला आहे. फेस स्पा आणि हया या दोन कंपन्या तिने स्थापन केल्या आहेत. तसेच, ती आणि तिचे पती मिळून हयात वेल्फेअर फाउंडेशन चालवतात, जे सामाजिक कार्यात सक्रिय आहे. वृत्तांनुसार, सनाची एकूण संपत्ती जवळपास 50 कोटी आहे.

सना खानचे पती मौलाना मुफ्ती अनस सय्यद हे धार्मिक नेते तसेच इस्लामिक विद्वान आहेत. ते हिरे व्यापारातही गुंतलेले असून त्यांची संपत्ती 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्याकडे भारताबरोबरच विदेशातही अनेक मालमत्ता आहेत. गुजरातमध्ये त्यांचे 20 कोटींचे आलिशान घर असून मुंबईतही कोट्यवधींचे घर आहे. सनाची आणि अनसची जोडी आज सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या प्रवासाचे, धार्मिक कार्यक्रमांचे आणि कौटुंबिक क्षणांचे फोटो ते चाहत्यांशी शेअर करत असतात.
लग्नानंतरही सनाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही, उलट तिच्या नव्या जीवनशैलीचे लोक आदराने कौतुक करतात. आज अभिनयापासून दूर असली तरीही सना खानचे नाव लोकांच्या ओठांवर कायम आहे. तिचे साधेपण, धार्मिकता आणि श्रीमंती यामुळे ती चाहत्यांसाठी अजूनही प्रेरणादायी ठरते.
सना खान ही बॉलिवूड अभिनेत्री (actress)आहे. जिने ‘जय हो’ सारख्या चित्रपटात सलमान खानसोबत आणि ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. तिने करिअरच्या शिखरावर असताना अभिनय सोडला आणि आता ती एक यशस्वी व्यवसायिक महिला आणि सामाजिक कार्यकर्ती आहे.
2020 मध्ये सनाने वैयक्तिक आणि धार्मिक कारणांमुळे बॉलिवूड आणि शोबिझ जगाला कायमचा निरोप दिला. तिने हिजाब आणि बुरख्याचा स्वीकार करत नव्या जीवनशैलीला सुरुवात केली.सना खानने 2020 मध्ये मौलाना मुफ्ती अनस सय्यदशी लग्न केले. तो एक इस्लामिक विद्वान आणि हिरे व्यापारी आहे.सना खान सध्या व्यवसायिक महिला आहे. ती ‘फेस स्पा’ आणि ‘हया’ या दोन कंपन्या चालवते. तसेच, ती आणि तिचे पती मिळून ‘हयात वेल्फेअर फाउंडेशन’ नावाचे सामाजिक कार्य करणारे फाउंडेशन चालवतात.
हेही वाचा :
फेसबुकमुळे प्रेमात पडले, देवळात लग्नही ! सासरी गेल्यावर…
14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन…
धनश्री वर्माचे 5 धक्कादायक खुलासे; फेक लग्न, भीती, रडणं..