जेवणाच्या ताटातील साधी डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर(dal) तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी ढाबा स्टाईल डाळ फ्राय बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या डाळ फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.

भारतीय जेवणाच्या ताटात कायमच असणारे पदार्थ म्हणजे डाळ(dal) भात. या पदार्थांशिवाय जेवण जेवल्यासारखे वाटतच नाही. जेवणात कितीही चांगले, चमचमीत पदार्थ बनवले तरीसुद्धा डाळ भात नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. पण जेवणात कायमच साधी डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ढाबास्टाईल दाल फ्राय बनवू शकता. बऱ्याचदा घरी बनवलेल्या डाळीला ढाबा स्टाईल चव येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. यामुळे पदार्थाची चव आणखीनच वाढेल आणि जेवणात चार घास जास्त जातील. ढाबा स्टाईल डाळ फ्राय तुम्ही गरमागरम जिरा राईस किंवा वाफाळत्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ढाबा स्टाईल डाळ फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
तुरीची डाळ
मोहरी
कांदा
टोमॅटो
हिंग
आलं लसूण पेस्ट
हळद
लाल तिखट
धणे पावडर
कोथिंबीर
कृती:
ढाबा स्टाईल डाळ फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये डाळ घेऊन तीन वेळा पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून डाळीच्या ४ शिट्ट्या (dal)काढा.
कढईमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता टाकून भाजा. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करा.
कांदा शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घालावे. कांदा व्यवस्थित लाल सोनेरी झाल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
नंतर त्यात हळद, लाल तिखट आणि धणे पावडर घालून मसाले व्यवस्थित भाजून घ्या.
मसाले भाजल्यानंतर त्यात शिजवून घेतलेली डाळ टाकून आवश्यकतेनुसार पाणी घाला. डाळीला उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.
फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मिरचीचे तुकडे आणि थोडी लाल मिरची पावडर टाकून फोडणी भाजा. तयार केलेली फोडणी डाळीवर टाकून मिक्स करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ढाबा स्टाईल डाळ फ्राय.
हेही वाचा :
भारतीय अजूनही रशियन सैन्यात…
अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात….
चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीने ओलांडली धोक्याची पातळी