मानसिक ताण, भावनिक संघर्ष आणि नात्यातील धक्के किती घातक ठरू शकतात, याचं उदाहरण इंग्लंडमध्ये पाहायला मिळालं. इंग्लंडमध्ये घडलेल्या घटनेत असाच हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. 32 वर्षांची जेड डॅमरेल, मार्केटिंगमध्ये शिक्षण घेतलेली आणि छंद म्हणून स्कायडायव्हिंग(Skydiver) करणारी, आयुष्याचा शेवट करण्यासाठीही आकाशात गेली.

15,500 फूटांवरून तिने विमानातून उडी घेतली. पण या वेळी ना तिने हेल्मेट घातले, ना मुख्य पॅराशूट उघडले, ना बॅकअपचा वापर केला. काही क्षणात ती जमिनीवर कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. हा कोणताही अपघात नव्हता, तर आत्महत्येचा निर्णय असल्याचं स्पष्ट झालं.

जेडचा तिच्या बॉयफ्रेंड बेन गुडफेलो सोबत ब्रेकअप रात्री झाला होता. तिचा प्रियकर बेन गुडफेलो याच्याशी तिचं नातं तुटलं आणि त्याच वेळी तिने शेवटचा निरोपाचा चिठ्ठी आपल्या कुटुंबालासाठी लिहून ठेवली. सकाळी ८.३० वाजता ती अगदी नेहमीप्रमाणे नाश्ता केला, हसतखेळत वेळ घालवला. पण १० वाजताच्या फ्लाइटमध्ये बसल्यावर तिचा निर्णय ठाम होता की आता परतायचं नाही.

जेड नवखी नव्हती. तिने आधीच 400 पेक्षा जास्त स्कायडायव्हिंग(Skydiver) केले होते. परंतु या वेळेस तिने जाणूनबुजून पॅराशूट न उघडता उडी घेतली. त्यामुळे हा अपघात नसून आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले.तिच्या अचानक जाण्याने कुटुंबीय शोकाकुल झाले आहेत. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मनाला चटका लावणाऱ्या आहेत. “जेड धाडसी, सुंदर आणि हटके व्यक्तिमत्वाची होती.

तिला आकाशात मुक्तपणे उडण्यात खरा आनंद मिळायचा. स्काय डायव्हिंग तिचं जीवन होतं आणि त्यातच तिला खरी ओळख मिळाली. तिचं प्रेम, तिचं अस्तित्व कधीही विसरलं जाणार नाही. काही तारे खूप तेजस्वी असतात पण लवकर मावळतात. जेड देखील तशीच होती. ” असे तिच्या कुटुंबाने सांगितले.

हेही वाचा :

शालेय पोषण आहाराची आता तपासणी होणार; शिक्षण विभागाची धडक मोहीम

भर रस्त्यावर मानवी सांगाडा; पोलिसांची उडाली धांदल, नेमकं काय घडलं?

1000 फुट उंचीच्या लाटांचा तडाखा, या देशाला त्सुनामीचा बसणार फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *