मारुती सुझुकीच्या अनेक कार मार्केटमध्ये लोकप्रिय(maruti suzuki xl6) आहेत. Maruti Suzuki XL6 ही त्यातीलच एक. मात्र, ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल. चला याबद्दल जाणून घेऊयात.

भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणीनुसार बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. कंपनीने देशात अनेक उत्तम कार (maruti suzuki xl6) ऑफर केल्या आहेत. अशीच एक कार म्हणाजे Maruti Suzuki XL6. ग्राहकांच्या अपेक्षेवर ही कार पूर्णपणे खरी उतरली आहे. त्यामुळेच तर ही मार्केटमध्ये आजही मोठ्या प्रमाणात विकली जात आहे.
Maruti XL6 ही एक सहा सीटर MPV पेट्रोल आणि CNG इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. जर तुम्ही या MPV चे CNG व्हर्जन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, पुढील 7 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा किती EMI भरावे लागेल?
Maruti XL6 CNG किंमत
XL6 ही मारुती सहा सीटर MPV म्हणून विकते. कंपनीने ही MPV CNG पर्यायात सुद्धा ऑफर करते. मारुती कंपनी त्याचा CNG व्हेरिएंट 14.77 लाख रुपयांच्या ऑन-रोड किमतीत उपलब्ध करून देत आहे. जर ही कार दिल्लीत खरेदी केली तर 1.30 लाख रुपयांच्या रजिस्ट्रेशनसह, इंश्युरन्ससाठी सुमारे 41 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, या MPV साठी TCS शुल्क आणि इतर शुल्क म्हणून 17485 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर त्याची ऑन-रोड किंमत 14.77 लाख रुपये होईल.
2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI
जर तुम्ही मारुती XL6 चा CNG व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 12.77 लाख रुपयांची रक्कम मिळवावी लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 12.77 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 20549 रुपये EMI भरावे लागतील.
लोन घेतलं तर महाग होईल कार
जर तुम्ही बँकेकडून 7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने 12.77 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 20549 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला मारुती एक्सएल6 च्या सीएनजी व्हेरिएंटसाठी सुमारे 4.49 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 19.26 लाख रुपये असेल.
हेही वाचा :
आजचा सोमवार ‘या’ 5 राशींसाठी भाग्यशाली!
बजेटमध्ये घ्या अविस्मरणीय प्रवासाचा आनंद….
भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज