टी-२० हा वेगवान खेळ आहे. सध्या क्रिकेटमधील (cricket)सर्वात लहान स्वरूप हे टी-२० क्रिकेटचे आहे. हा फॉरमॅट लोकप्रिय बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० चा प्रभाव वाढताना दिसत आहे. यामध्ये फलंदाज आपले वर्चस्व गाजवत असल्याचे म्हटले जाते परंतु या खेळात गोलंदाज देखील आपले कौशल्य दाखवतात. या क्रिकेट फॉरमॅटमध्ये अनेक गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने प्रभावी काम केले आहे. तसेच भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच फलंदाजांसाठी ओळखले जात असेल तरी जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह सारख्या गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळा ठसा उमटवला आहे.

एक धक्कादायक बाब म्हणजे टी-२० च्या पहिल्या १० च्या सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये एकही भारतीय गोलंदाजाचे नाव नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, देशांतर्गत क्रिकेट आणि लीग क्रिकेटसह टी-२० च्या टॉप १० गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर अफगाणिस्तानचा रशीद खान पहिल्या स्थानावर विराजमान आहे. ज्याने २०१५ ते २०२५ दरम्यान ४८७ सामन्यांमध्ये ६६० बळी टिपले आहेत. ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या स्थानावर असून त्याने २००६ ते २०२४ दरम्यान ५८२ सामन्यांमध्ये ६३१ विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजचा सुनील नारायणचा क्रमांक तिसरा आहे. त्याने २०११ ते २०२५ दरम्यान ५५७ सामन्यांमध्ये ५९० बळी मिळवले आहे.

चौथ्या स्थानाबाबत दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिरचा नंबर लागतो. त्याने २००६ ते २०२५ दरम्यान ४३६ सामन्यांमध्ये ५५४ गडी बाद केले आहेत. बांगलादेशचा शकिब अल हसन पाचव्या स्थानावर विराजमान आहे. त्याने २००६ ते २०२५ या काळात ४५७ सामन्यांमध्ये त्याने ५०२ शिकार केल्या आहेत.

वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेलने २०१० ते २०२५ कालावधीत ५६४ सामन्यांमध्ये ४८७ बळींसह सहावे स्थान पटकावले आहे. इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन २००८ ते २०२५ दरम्यान ४१८ सामन्यांमध्ये ४३८ बळींसह सातव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा वहाब रियाझ २००५ ते २०२३ दरम्यान ३४८ सामन्यांमध्ये ४३८ बळींसह आठव्या स्थानी वियरजमान आहे. पाकिस्तानचा मोहम्मद आमिरने २००८ ते २०२५ कालावधीत ३४४ सामन्यांमध्ये ४०१ बळी घेऊन नववे स्थान घेतले आहे आणि श्रीलंकेचा लसिथ मलिंगा २००४ ते २०२० काळात २९५ सामन्यांमध्ये ३९० बळी घेत दहावे स्थान काबिज केले आहे.

या यादीमध्ये एक देखील भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. युजवेंद्र चहलचे नाव सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत समाविष्ट आहे. २००९ ते २०२५ दरम्यान त्याने ३२६ सामन्यांमध्ये ३८० विकेट्स घेऊन तो या यादीत चौदाव्या स्थानावर आहे.
बीसीसीआयकडून आपल्या कोणत्याही खेळाडूला भारताबाहेर खेळल्या जाणाऱ्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात येत नाही. यामुळे, भारतीय गोलंदाजांना फक्त देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये(cricket) टी-२० खेळण्याची परवानगी आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज टॉप १० गोलंदाजांच्या यादीत येत नाहीत.

हेही वाचा :

8 वी उत्तीर्ण उमेदवारांनाही सरकारी नोकरीची संधी

यूट्यूबर अन् इन्फ्लूएन्सर्साठी नवीन नियम…..

ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *