भारतामध्ये गणेशोत्सव (Ganeshotsav)साजरा केला जात आहे, घरोघरी गणरायाचे स्वागत केले जात आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारताचे क्रिकेट खेळाडू सध्या विश्रांती करत आहेत त्याचबरोबर गणरायाचे स्वागत आणि सेवा करण्यात देखील व्यस्त आहेत. आता रोहित शर्मापासून ते जहीर खानपर्यत सर्वानीच सोशल मिडियावर त्याच्या गणरायाचे फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे यामध्ये तो गणपती बाप्पाला नमन करताना दिसत आहे. यामध्ये त्याने निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.

आशिया कपचा कर्णधार सुर्यकुमार यादवने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन गणरायाचे स्वागत केले आहे. त्याने त्याच्या पत्नीसोबत त्याने दोन फोटो शेअर केले आहेत आणि त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेट देव सचिन तेंडुलकर याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तो गणरायाची पुजा करताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या दिनी त्याने लाल रंगाचा कुर्ता घातला आहे.

भारताचा माजी खेळाडू जहीर खान याने गणेशोत्सवाच्या(Ganeshotsav) शुभ दिनी त्याच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. त्याने गणरायाचे स्वागत देखील केले आहे. त्याचबरोबर त्याची पत्नी आणि मुलासोबत खास फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा :
मुलांच्या हातात बाईकची चावी देणं पडलं महागात; घडला भयंकर अपघात, Video Viral
जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ; विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी
‘शोले’ चित्रपटाच्या 50 वर्षांनंतर, त्याच्या शूटिंगची ठिकाणे कशी दिसतात?