सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओज, फोटो वेगाने व्हायरल होत असतात.(woman)कधी कधी ते मजेशीर, हसवणारे असतात, तर कधीही ते पाहून आपणच आश्चर्यचकित होत असतो. मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकलचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात. कधी त्यात गर्दी, कधी भांडणं किंवा कधी काही युनिक कंटेंटही दिसतो. सध्या मुंबईतल्या लोकलचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे मात्र नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. लोकलमधून प्रवास करताना एक तरूणीने घातलेले कपडे, तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी यालवरून एका महिलेला एवढा राग आला की ती त्या मुलीला अद्वातद्वा बोलू लागल.

संतापाच्या भरात आपण काय बोलतोय याच तिला भानंही नव्हतं, पण तिच्या या आक्रस्ताळेपणामुळे रेल्वेच्या डब्यातील इतर लोकं मात्र कानकोंडे झाले होते. आणि ती ज्या मुलीला व तिच्या मैत्रिणींना उद्देशून बोलत होती, त्यांना तर काय बोलावं समजतच नव्हतं. रागारागात बोलताना एका क्षणी ती महिला असं काही बोलली की सगळेच अवाक झाले.(woman)सोशल मीडिया साईट X वर पूर्वीच ट्विटर नावाच्या एका यूजरने 26 ऑगस्ट 2025 रोजी लोकलच्या डब्यातला एक व्हिडीओ शेअर केला. बुरखा घातलेली एक तरूणी आणि तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या मैत्रिणी पाहून एका महिलेचं डोकं सटकलं आणि तिने त्यांना उभं-आडवं झापलं. ती बुरखा घातलेली मुलगी हिंदू मुलींसोबत प्रवास करत असल्यामुळे त्या महिलेने तिला खूपच सुनावलं. मात्र तिची भाषा, आवेश आणि रागावण कोणालाच पसंत पडलं नसल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे.
Viral video from Mumbai Local Railway Train:
— Treeni (@TheTreeni) August 26, 2025
Muslim woman started shouting and abusing a Burqa-clad girl, as she was travelling with her Hindu friends.
She said – "Look at this Muslim girl, she is shaming our community… If you want to roam naked, than do it without wearing… pic.twitter.com/nQCb1EjHjE
ती महिला त्या तरूणीवर “समाजाला लाज आणत असल्याचा” आरोप मोठ्याने करत होती. व्हिडीओमध्ये ती म्हणते : ” या मुस्लिम मुलीकडे बघा जरा, ती आमच्य समुदायाला लाज आणत्ये… जर तुला नग्न फिरायचं असेल तर बुरखा न घालता फिर ना ! आमचा बुरखा बदनाम होतोय” अशा शब्दांत त्या महिलेने तिला वाट्टेल ते सुनावलं.मात्र त्या महिलेचं वागणं, तिचा आरडाओरडा, तिचं बोलणं ऐकून ट्रेनमधले बाकीचे प्रवासी खूपच अस्वस्थ दिसत होते. काहींनी चिंतेने एकमेकांकडे पाहिं तर काहीजण चूपचाप बसून ऐकून न ऐकल्यासारखं करत होते. आणि ज्या बुरखा घातलेल्या तरूणीवर ही सगळी टीका केली जात होती, ती तर मान खालून शांत बसली होती.मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये पुरुष आणि महिलांमधील मारामारीचे व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. पण या व्हिडिओमुळे वैयक्तिक स्वातंत्र्य, ओळख आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेबद्दल वादविवाद सुरू झाला आहे.

या व्हिडिओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. (woman)अनेक सोशल मीडिया यूजर्सनी,महिलेची ती वक्तव्य असहिष्णू आणि प्रतिगामी म्हणत त्याचा निषेध केलाय. तर काहींनी असा युक्तिवाद केला की, एखाद्या मुलीची,तरूणीची संगत, तिच्या मैत्रिणी कोण, हा सार्वजनिक तपासणीचा विषय असू नये. या व्हिडिओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral