भारतीय (Indian)क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या मैदानातील खेळासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात शॉने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तो अभिनेत्री व इन्फ्लुएंसर आकृती अग्रवालसोबत दिसला आणि देशवासीयांना “गणपती बाप्पा मोरया” म्हणत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चेला पुन्हा उधाण आलं,अखेर ही आकृती अग्रवाल कोण आहे?आकृती अग्रवाल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि अभिनेत्री आहे. फॅशन व लाइफस्टाइल कंटेंटमुळे ती इंस्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय झाली असून तिच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल 3.5 मिलियनपेक्षा जास्त आहे.

यूट्यूबवरही तिच्या चॅनेलला 70 हजारांपेक्षा अधिक सब्सक्राइबर्स आहेत. इंस्टाग्रामवरील तिचे रील्स वारंवार व्हायरल होत असतात. 22 वर्षीय आकृतीचा जन्म लखनऊ येथे झाला. पुढे उच्च शिक्षणासाठी ती मुंबईला आली आणि बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) पूर्ण केले. त्यानंतर ती सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावत असून लवकरच ती तेलुगू चित्रपट त्रिमुखा’ मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

पृथ्वी शॉ यापूर्वी अभिनेत्री प्राची सिंग आणि निधी तपाडियासोबत नाव जोडले गेले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आकृती अग्रवालसोबतच्या त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शॉने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रथमच आकृतीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. आता गणेशोत्सवातही दोघांनी एकत्रित शुभेच्छा दिल्यानं या नात्याविषयीच्या चर्चा अधिकच रंगल्या(Indian).

हेही वाचा :
विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दिर, नको ते करू लागला…
या क्रिकेट खेळाडूंनी केले गणरायाचे स्वागत
मुलांच्या हातात बाईकची चावी देणं पडलं महागात; घडला भयंकर अपघात, Video Viral