रोजच्या पुलावाला नवा ट्विस्ट देण्यासाठी ‘अचारी पनीर पुलाव’ हा एकदम उत्तम पर्याय आहे.(Pulao) लोणच्याच्या मसाल्याचा खास खमंग स्वाद आणि पनीरचे मऊ तुकडे यामुळे हा पुलाव अधिक चविष्ट लागतो. पार्टी असो वा खास डिनर, हा पुलाव नक्कीच सगळ्यांना आवडणार . चला याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

लागणारे साहित्य :
बासमती तांदूळ – २ कप अर्धा तास पाण्यात भिजवलेले
पनीर – २०० ग्रॅम चौरस तुकडे केलेले
तेल / तूप – ३-४ टेबलस्पून
कांदा – २ मध्यम पातळ(Pulao) चिरलेले
टोमॅटो – १ मोठा चिरलेला
हिरवी मिरची – २ चिरलेल्या
आलं-लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
दही – ३ टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
पाणी – ३ ते ४ कप
अचारी मसाल्यासाठी :
मोहरी – १ टीस्पून
मेथी दाणे – ½ टीस्पून
सौंफ – १ टीस्पून
कलौंजी (निगेला) – ½ टीस्पून
जीरे – १ टीस्पून
लाल तिखट – १ टीस्पून
हळद – ½ टीस्पून
धनेपूड – १ टीस्पून
गरम मसाला – ½ टीस्पून

कसा बनवायचा आचारी पनीर पुलाव?
एका कढईत तेल गरम करून पनीरचे तुकडे हलके सोनेरी भाजून घ्या. बाजूला ठेवा.
त्याच तेलात अचारी मसाल्याचे पदार्थ मोहरी, मेथी, सौंफ, कलौंजी, जिरे टाकून फोडणी करा.मग कांदा घालून परता, नंतर आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि टोमॅटो घाला.(Pulao)हे छान परतल्यावर दही टाकून मिक्स करा. त्यात लाल तिखट, हळद, धनेपूड आणि गरम मसाला मिसळा.आता भिजवलेला तांदूळ घालून मसाल्यात छान परता.३ ते ४ कप पाणी आणि मीठ घालून झाकण ठेवून शिजवा.तांदूळ जवळजवळ शिजल्यावर परतलेले पनीर घालून ५ मिनिटं दम द्या.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral