दगडी चाळीचा अनभिषिक्त सम्राट आणि कुख्यात गँगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी अखेर १८ वर्षांनंतर तुरुंगाच्या बाहेर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनानंतर आज (दि. ३ सप्टेंबर) नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून(prison) त्याची सुटका झाली.

सुटकेनंतर नागपूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात गवळीला थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर पोहोचवले. माध्यमांशी संवाद टाळत गवळी विमानाने मुंबईकडे रवाना झाला. गवळी २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता(prison). पोलीस तपासात या हत्येची सुपारी गवळीने दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर २००८ मध्ये त्याला अटक झाली आणि न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुंबई उच्च न्यायालयानेही हा निकाल कायम ठेवला होता.

सध्या वयाच्या ७७व्या वर्षी असलेल्या गवळीने सर्वोच्च न्यायालयात आपली शिक्षा स्थगित करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर पुढील सुनावणी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. दरम्यान, त्याला अनेकदा संचित रजा मिळाली होती, मात्र आता जामिनावर सुटका झाल्याने कायमस्वरूपी दिलासा मिळतो का, हे पुढील सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे.मुंबईच्या अंडरवर्ल्डवर एकेकाळी गवळीचे वर्चस्व होते. आता सुटकेनंतर तो पुढे काय पावले उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

125 वर्षांपूर्वी जग कसं होतं? कल्पनेपलीकडचा दुर्मिळ व्हिडिओ

जरांग्या तू कोण आहेस? आई-बहिणीवरुन… गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीचे शब्द

मला मराठा समाजाचे वाटोळे करायचे असते तर 58 लाख…. जरांगे कडाडले….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *