महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने भगवा फडकावल्यानंतर आता (comment) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू असताना समरजीत घाटगे यांची भाजप पक्षात घरवापसी झाली आहे. विशेष म्हणजे अधिकृत पक्षप्रवेशाआधीच रविवारी 18 जानेवारी कोल्हापूर येथे झालेल्या महायुतीच्या कोल्हापुरातील बैठकीत समरजीत घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घाटगेंच्या पक्षप्रवेशाला शिक्कामोर्तब देत फक्त औपचारिकता बाकी असल्याचे जाहीर केले. तर समरजीत घाटगे यांच्या या पक्षप्रवेशाने कोल्हापूरच्या राजकारणातील समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरातीलमहायुतीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हा परिषद (comment)आणि पंचायत समिती निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. बैठकीस मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह कोल्हापुरातील खासदार, आमदार आणि महायुतीचे व पदाधिकारी उपस्थित होते. समरजीत घाटगे यांची महायुती नेत्यांसोबत प्रमुख भूमिकेत उपस्थिती लाभली, ज्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण पुष्टी मिळाली.चंद्रकांत पाटील यांनी देखील बैठकीनंतर स्पष्ट सांगितले की, “समरजीत घाटगे पुन्हा एकदा भाजपच्या ब्रॉड कोल्डमध्ये आले आहेत. पक्षप्रवेशाची केवळ टेक्निकल बाब बाकी असून ती लवकरच पूर्ण होईल. त्यांचे कार्यकर्ते आता कमळ चिन्हावरच निवडणूक लढवतील.” जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या पक्षप्रवेशाचा अधिकृत सोहळा होण्याची शक्यता आहे.
बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांना आवाहन केले की, (comment)“मागे पहिला शौमिका महाडिक आणि नंतर राहुल पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष होते. तसं होऊ द्यायचं नाही. युती स्ट्राँग करा. प्रत्येक माणूस महत्त्वाचा असला, तरी अपरिहार्य नाही. युती झाली तर सर्वांनाच फायदा होईल.” त्यांनी सांगलीतही निवडणुकीनंतर अशा युतीचा प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकांप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात भाजपच महापौर देईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत 68 जागांवर शक्यतो युती करा, इतर कोणत्याही पक्षासोबत युती करा पण काँग्रेससोबत नको, अशी सूचना देखील त्यांनी उपस्थित सर्वांना दिली.
पूर्वी भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष असलेले समरजीत घाटगे(comment) हे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले होते. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढलेल्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत त्यांनी शाहू समूह म्हणून हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली होती. तर नुकतेच सोशल मीडियावरून तुतारी चिन्ह हटवल्यानंतर कमळाकडे वळण्याचे संकेत त्यांच्याकडून मिळाले. कागल नगरपालिकेत महायुतीशी शाहू गटाची युती यशस्वी झाली असून, जिल्हा परिषदेतही अशी मजबूत आघाडी झाल्यास ऐतिहासिक वन-वे निकाल मिळेल.
तसेच घाटगेंचा सहभाग महायुतीला कमळ फुलवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.दरम्यान, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर लढणार असून, घाटगेंच्या प्रवेशाने कोल्हापूरच्या राजकारणात नवा बदल घडणार आहे. तर महायुतीला विजय मिळवण्यासाठी हा मोठा बूस्टर ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूरची सत्ता समीकरणे बदलणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
आता व्हॉट्सअॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स
Windows 10 आणि 11 युजर्सना अलर्ट, CERT-In चा इशारा, जाणून घ्या
यंदाच्या बजेटमधून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, जनधन खातेधारकांसाठी महत्त्वाचा बदल होणार?