ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर सुरू झाला तरी लाडकी बहीण योजनेचा(Yojana) लाभार्थींना अद्याप हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी महिला चिंतेत असून, “ऑगस्टचे पैसे कधी मिळणार?” असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे हप्ते मिळून महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात ३,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र हे पैसे एकाच वेळी दिले जातील की टप्प्याटप्प्याने, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

लाडकी बहीण योजनेतील(Yojana) नोंदणीबाबत भाष्य करताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की,“या योजनेत २ कोटी ६३ लाखांहून अधिक महिलांची नोंदणी झाली होती. सर्व विभागांकडून डेटा मागवला आणि स्क्रूटिनी केली असता हा आकडा २ कोटी ४८ लाखांवर आला. ही तपासणी केली नसती तर आकडा आणखी वाढला असता.”
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, सरकारने योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी काटेकोर तपासणी सुरू केली आहे.यापूर्वी या योजनेतून २ हजारांहून अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी गैरफायदा घेतल्याचे उघड झाले होते. एवढंच नाही तर, दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी असलेल्या या योजनेचा १४ हजारांपेक्षा जास्त पुरुषांनीही गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये लाटल्याचे समोर आले होते.या प्रकरणी सरकारने संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

सध्या गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिलांना आशा आहे की सरकार सप्टेंबर महिन्यातच दुप्पट दिलासा देईल.
हेही वाचा :
कोल्हापूरात खून; रिक्षाचालकाचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? भाजप नवीन जबाबदारी देण्याच्या तयारीत
आज सोनं झालं स्वस्त…वाचा 24 कॅरेटचे भाव