भारतीय कमोडिटी बाजारात आज गुरुवारी सोनं (Gold)आणि चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. MCX वर आज सोनं 10 ग्रॅम 1,06,074 प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावला आहे. काल सोन्याचा भाव 1,07,195 रुपये इतके होता. म्हणजेच दिवसभरात सोनं 1,212 रुपयांची घसरण झाली आहे.

सोनंबरोबरच चांदीच्या दरातही घट झाली आहे. MCXवर चांदीचा दर 1,22,945 प्रति किलोवर स्थिरावली आहे. मागील सत्राच्या तुलनेत 523 अंकांनी कमी आहे. साधारण 0.42 ट्क्क्यांची घट झाली आहे. चांदीने अलीकडेच उच्चांक दर गाठला आहे. 1,24,259च्या उच्चांकावर चांदीचे दर पोहोचले आहे. देशांतर्गंत बाजारात किंचितशी घसरण झाली आहे. मात्र सोनं आणि चांदी दोघही उच्चांकी दरांवर ट्रेड करत आहेत. यामुळं गुंतवणुकदरांना दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या(Gold) किंमती आता उच्चांकी स्तरावर पोहोचलं आहे. स्पॉट गोल्ड $3,570.66 प्रति औंस (+1.07%) वर पोहोचले आहे. यूएस गोल्ड फ्युचर्स $3,634.50 प्रति औंस (+1.15%)वर पोहोचले आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,06,860 रुपयांवर स्थिरावले असून 110 रुपयांनी घसरले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली असून 97,950 रुपयांवर स्थिरावली आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 90 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 80,140 रुपयांवर पोहोचली आहे.

10 ग्रॅम 22 कॅरेट 97,950 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,06,860 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 80,140 रुपये
ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,795 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,686 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 8,014 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 78, 360 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 85, 488 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 64, 112 रुपये
22 कॅरेट- 97,950 रुपये
24 कॅरेट- 1,06,860 रुपये
18 कॅरेट- 80,140 रुपये
-24 कॅरेट: 99.9% शुद्ध सोने, गुंतवणुकीसाठी वापरले जाते.
-22 कॅरेट: 91.6% शुद्ध सोने, दागिन्यांसाठी वापरले जाते
-18 कॅरेट: 75% शुद्ध सोने, अधिक टिकाऊ दागिन्यांसाठी वापरले जाते
- सोन्याची शुद्धता तपासा
-विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा.
-मेकिंग चार्जेस आणि GST (3% सोन्यावर आणि 5% मेकिंग चार्जेसवर) विचारात घ्या.
-खरेदीचे बिल आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या.
सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंमती अपडेट होतात.
हेही वाचा :
संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद….
फोटो लगेच हटवा नाहीतर पब्लिकली कॉल-आऊट करेन सोनाक्षी सिन्हा….
महिलेला जबरदस्ती बाथरूममध्ये नेले,मारहाणही केली… बलात्कारी अभिनेत्याला अटक