कार्तिक आर्यनने अलिबागच्या ‘शॅटो डी अलिबाग’ या लक्झरी(alibaug) प्रोजेक्टमध्ये २००० चौरस फूटचा पहिला प्लॉट २ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने अलिबागमध्ये आपली पहिली जमीन खरेदी करून मोठ्या चर्चेचा विषय बनवला आहे. ‘Chateau de Alibaug’ प्रकल्पात 2000 स्क्वेअर(alibaug) फूटचा भूखंड त्यांनी 2 कोटी रुपयांना घेतला आहे. हा भूखंड ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या कंपनीकडून खरेदी करण्यात आला आहे. यासोबतच, कार्तिकने अमिताभ बच्चन आणि क्रिती सेनन यांच्या क्लबमध्येही प्रवेश केला आहे, कारण दोघांनीही या कंपनीच्या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे.
कार्तिकने या गुंतवणुकीबाबत सांगितले, “अलिबाग मुंबईजवळील गुंतवणुकीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. मी तिथे माझे स्वतःचे घर बांधण्याचा विचार करतोय. ही माझी पहिली जमीन गुंतवणूक आहे आणि मला ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’वर पूर्ण विश्वास आहे. या गुंतवणुकीमुळे मला खूप आनंद झाला आहे.”
‘Chateau de Alibaug’ प्रकल्प हिरव्या परिसरात वसलेला असून, आधुनिक सोयीसुविधांनी युक्त आहे. येथे छतावरील बाग, लाउंज रूम, रिफ्लेक्सोलॉजी ट्रॅक, पूल डेक, बहुउद्देशीय हॉल आणि दोन क्लबहाऊस आहेत. या सुविधांमुळे रहिवाशांना आराम, मनोरंजन आणि सामुदायिक उपक्रमांसाठी उत्तम अनुभव मिळतो.
अभिनंदन लोढा यांनी कार्तिकचे स्वागत करताना सांगितले, “‘Chateau de Alibaug’ अलिबागमधील पहिला ब्रँडेड भूखंड विकास प्रकल्प आहे. कार्तिकची गुंतवणूक दाखवते की अलिबाग मुंबईकरांसाठी आलिशान आणि प्रशस्त घरांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनत आहे. याआधी अमिताभ बच्चन आणि क्रिती सेनन यांनीही येथे गुंतवणूक केली आहे.” गेल्या काही वर्षांत अलिबाग बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींसाठी एक पसंतीचे ठिकाण बनले आहे.
मुंबईजवळ असल्यामुळे आणि रो-रो फेरी तसेच इतर कनेक्टिव्हिटीमुळे येथे पोहोचणे सोपे झाले आहे. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी 10000 स्क्वेअर फूट भूखंड 10 कोटी रुपयांना खरेदी केला, त्यानंतर क्रिती सेननने ‘Soul de Alibaug’ प्रकल्पात 2000 स्क्वेअर फूटची जमीन घेतली. कार्तिक आर्यनच्या या गुंतवणुकीमुळे अलिबागचे महत्त्व आणखी वाढले आहे.
हेही वाचा :
मराठा आरक्षणावर प्रश्नचिन्ह! 58 लाख नोंदींचा डाटा सरकारकडे नाही
मराठ्यांचं टेन्शन वाढलं! ‘हा सरसकट जीआर नाही
रस्त्यावर भीक मागतोय हा प्रसिद्ध कलाकार….