जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर(announcement) आता केंद्र सरकारकडून आणखी एक मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे, मोदी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मोठी बातमी! जीएसटीमधील बदलानंतर आता मोदी सरकारची आणखी एक मोठी घोषणा, दिवाळीपूर्वी मिळणार डबल गिफ्ट. मोठी बातमी समोर येत आहे, केंद्र सरकारने जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करून जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे, नव्या निर्णयानुसार 28 टक्के आणि 12 टक्के असे जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत, 18 टक्के आणि 5 टक्के असे आता दोनच जीएसटीचे स्लॅब असणार आहेत.

केंद्र सरकारच्या जीएसटीच्या या नव्या धोरणामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला असून, यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. अनेक जीवनावश्यक वस्तूंवर आता केवळ 5 टक्के जीएसटी असणार आहे.

ही देशातील जनतेसाठी केंद्र सरकारची मोठी भेट मानली जात आहे, मात्र आता दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदी सरकारनं मोठी घोषणा केली आहे.(announcement) केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे, केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता वीस वर्ष सेवा जरी झाली तरी पेन्शनचा लाभ मिळणार आहे, पूर्वी 25 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळायची.

नव्या पेन्शन योजनेनुसार आता कर्मचाऱ्यांना वीस वर्ष जरी नियमित सेवा झाली तरी देखील रिटायरमेंट नंतर मिळणारे सर्व लाभ मिळणार आहेत. त्यांना पेन्शन देखील मिळणार आहे. पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेचे नियमितपणे 25 वर्ष पूर्ण केले आहेत, अशाच (announcement)कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळायचा. मात्र आता या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे, गेल्या अनेक दिवसांपासून या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होती, अखेर दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयाचा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

दरम्यान यामध्ये असं देखील म्हटलं आहे, की जर एखाद्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असेल आणि त्यामुळे जर त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं असेल तर अशा परिस्थितीत त्या कर्मचार्‍याला युपीएसमधून एनपीएसमध्ये कनव्हर्ट करता येणार नाही, यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा :

पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार

शिल्पा आणि राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी पोलिसांनी बजावले…

तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेलं नंतर….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *