बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(entertainment news) फक्त आपल्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरच्या कामगिरीसाठीच नाही तर आपल्या प्रामाणिक आणि गंभीर वक्तव्यांमुळेही प्रसिद्ध आहे. नुकताच तो इंडस्ट्रीतील काही चुकीच्या प्रथा आणि स्टार्सच्या अवास्तव मागण्यांवर थेट बोलत चर्चेत आला आहे. आमिरच्या म्हणण्यानुसार, काही बॉलिवूड स्टार्स त्यांच्या जिम, किचनसाठी व्हॅनिटी व्हॅन आणि खासगी कर्मचार्यांचा खर्च निर्मात्यांवर लादत असल्याचे खूपच चुकीचे आहे.

कोमल नाहटासोबतच्या चर्चेत आमिरने इंडस्ट्रीतील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले की, ‘मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो, तेव्हा एक प्रथा होती की, निर्माता अभिनेत्याच्या ड्रायव्हर आणि असिस्टंटचा खर्च उचलायचा. मला ही प्रथा खूप विचित्र वाटली.’ त्यांनी प्रश्न उपस्थित केला, ‘ड्रायव्हर आणि असिस्टंट माझ्यासाठी काम करतात, तर त्यांचा खर्च निर्माता का उचलतोय? जर तो माझ्या कर्मचाऱ्यांचा पगार देतो, तर उद्या तो माझ्या मुलांची शाळेची फीही देईल का? हे कुठे थांबणार?’ आमिरच्या(entertainment news) मते, निर्मात्याने फक्त थेट चित्रपटाशी संबंधित खर्च उचलावा, जसं की मेकअप, हेअर स्टाइल, कॉस्ट्यूम आणि सेट डिझाइनचा खर्च.
परंतु खासगी ड्रायव्हर, हेल्पर किंवा जिम आणि किचनसाठीचे खर्च निर्मात्यांवर लादणं ही पूर्णपणे चुकीची प्रथा आहे. ते पुढे म्हणाले, ‘ही समस्या आता खूप गंभीर झाली आहे. आजकाल काही स्टार्स त्यांच्या ड्रायव्हर्सनाही पगार देत नाहीत आणि तो खर्च थेट निर्मात्याकडून वसूल करतात. तसेच स्पॉट बॉय, ट्रेनर, शेफ आणि इतर कर्मचार्यांचा खर्चही निर्मात्यांवर टाकला जातो.’
आमिरने नमूद केले की, काही स्टार्स सेटवरच लाइव्ह किचन ठेवतात आणि त्याचा खर्चही निर्मात्याकडून वसूल करतात, तसेच जिमसाठी वेगळ्या व्हॅनिटी व्हॅनसुद्धा मागवतात. आमिरने स्पष्ट केले की, त्याला या सुविधांवर काही आक्षेप नाही, परंतु हा खर्च निर्मात्यावर लादणे चुकीचे आहे. ते म्हणाले, “हे स्टार्स करोडो रुपये कमावतात, तरीही त्यांच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकत नाहीत.
हे खूप लाजिरवाणे आहे आणि इंडस्ट्रीसाठी हानिकारक आहे.’ आमिरचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. चाहते आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ या प्रथेबाबत त्यांच्याशी सहमत आहेत. आमिर खानने पुन्हा एकदा सिद्ध केले की, केवळ स्टारडम नव्हे तर सत्य बोलण्याचा धैर्यही त्यांच्याकडे आहे, जे इंडस्ट्रीतील चुकीच्या पद्धतींना प्रकाशात आणते.
हेही वाचा :
“मला संपवायचा प्रयत्न होता”; अशोक चव्हाणांचा खळबळजनक दावा
टीम इंडियाची Hockey Asia Cup 2025, च्या अंतिम फेरीत धडक
वंशाच्या दिव्यासाठी आईनं पोटच्या २ महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं; पाण्याच्या टाकीत बुडवलं