आपण आपले घर सजवण्यासाठी पैसा खर्च करत असतो. (decorative)घरातील फर्निचर, वनस्पती, पेंटिंग्ज आदी सजावटीच्या वस्तूंच्या मदतीने घर सजवत असतो.मोठा पैसा खर्च करूनही घरात नेहमी भांडणं होत असतात. घरात अशांतता कायम राहते. यामागे एक कारण वास्तुदोषाचा आहे. वास्तूदोषाचं कारण हे अगदी छोटे असते तरीही आपल्या जीवनात शांतता येत नाही. हे छोटं कारण म्हणजे बूट आणि चप्पलशी संबंधित वास्तु नियम. वास्तुशास्त्रात बूट आणि चप्पलशी संबंधित वास्तु नियमांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

वास्तुशास्त्रातील जाणकारांच्या मते, जर हे नियम योग्यरित्या पाळले गेले तर घरात होणारी भांडणं आणि वाद आपोआप संपतील. घरात आणि कुटुंबात आनंद, समृद्धी आणि कल्याणाचे वातावरण निर्माण होईल. वास्तुशास्त्रात काही ठिकाणे पवित्र मानली जातात, जिथे बूट आणि चप्पल घालून जाणे अशुभ आहे. (decorative) या नियमांचे पालन केल्याने घरात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहू शकते.

वास्तुशास्त्रानुसार, घरातील पूजास्थान हे सर्वात पवित्र स्थान आहे. ज्याप्रमाणे आपण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपले बूट आणि चप्पल काढतो, त्याचप्रमाणे आपण घरातील मंदिर किंवा देव्हाऱ्याजवळ बूट घालून जाऊ नये. जर बूट आणि चप्पल घालून जात असाल तर देवी-देवतांचा अपमान मानले जाते. त्यामुळे घराची शांती भंग होऊ शकते.

स्वयंपाकघरात पादत्राणे वापरू नका वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला पवित्र स्थान मानले जाते, कारण येथे आई अन्नपूर्णा राहते. (decorative) वास्तुशास्त्रानुसार, बूट आणि चप्पल घालून स्वयंपाकघरात प्रवेश करणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता निर्माण होऊ शकते. नकारात्मक ऊर्जा पसरू शकते. वास्तुशास्त्रात तिजोरीला देवी लक्ष्मीचे स्थान मानले जाते. तिजोरीजवळ बूट आणि चप्पल घालून जाणे म्हणजे पावित्र्याचे उल्लंघन करण्यासारखे असते. आर्थिक नुकसान आणि पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून वास्तु नियमांनुसार, बूट आणि चप्पल घालून कधीही तिजोरीजवळ जाऊ नये.

हेही वाचा :

नवीन आयकर विधेयकात काय काय बदललं? ७ नियमांमध्ये झाला मोठा बदल
अंगात 4 भुतं, 11 वेळा संभोग कर, अन्यथा नवरा मरेल अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
उद्यापासून सुरू होतोय फ्लिपकार्टचा Independence Day Sale; खरेदीवर मिळणार 50% पर्यंत बंपर डिस्काउंट

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *