उत्तर प्रदेश – एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका डॉक्टरवर त्याच्या प्रेयसीवर(girlfriend) क्रूर हल्ला करण्याचा आरोप आहे. माहितीप्रमाणे, डॉक्टरने युवतीला उपचाराच्या बहाण्याने तीन इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि नंतर तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर धारदार शस्त्राने खोल जखमा केल्या. त्यानंतर त्याने युवतीला निर्वस्त्र करून दिल्ली-लखनऊ हायवेवर फेकले, ज्यामुळे मृत्यूला अपघाताचे रूप दिले जाऊ शकते, अशी त्याची योजना होती.

सुदैवाने, युवती जिवंत राहिली आणि रक्तबंबाळ अवस्थेत गावकऱ्यांच्या लक्षात आली. गावकऱ्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करून पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी डॉक्टरची चौकशी केली आणि त्याने सुरुवातीला युवतीला ओळखत नसल्याचे सांगितले, परंतु मोबाइल कॉल डिटेल्सवरून त्याचा खोटा प्रचार उघड झाला. नंतर डॉक्टरने युवतीसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली.
तपासात समोर आले की, ही युवती बदायूं जिल्ह्यातील असून पाच वर्षांपूर्वी बरेलीच्या मेडिकल कॉलेजमधून नर्सिंग पूर्ण केली होती. तिची ओळख बीएएमएस डॉक्टरशी त्याच्या खासगी रुग्णालयात काम करताना झाली. डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवले, पण त्यानंतर तिला समजले की तो विवाहित आहे. या कारणास्तव दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

एसएसपी अनुराग आर्य यांनी सांगितले की, डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि त्याची सखोल चौकशी सुरू आहे. हळूहळू प्रकरणाचे तपशील उघडत आहेत आणि पोलिस घटनास्थळी अधिक तपास करत आहेत(girlfriend).
हेही वाचा :
माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी… नग्न अनया बांगरच्या विधानाने खळबळ
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी…..
फेम गायकाचा स्कूबा डायव्हिंगवेळी अपघाती मृत्यू