महाराष्ट्रातील लाडकी (Ladki)बहीण योजनेत ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या संख्येने अर्ज रद्द करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात, परंतु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि ई-केवायसी न केलेल्या महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत.

मागील महिन्यात अहिल्यानगरमध्ये तब्बल १७,५۰۰ अर्ज रद्द करण्यात आले असून, एकूण ११ लाख महिलांपैकी काहींनी वयोमर्यादा, उत्पन्न, कुटुंबातील महिलांची संख्या आणि वाहनधारणा यासारख्या निकषांचे उल्लंघन केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही पडताळणी करण्यात आली असून, नियमाप्रमाणे महिलांचे अर्ज रद्द केले गेले आहेत.
महिलांना आता दोन महिन्यांच्या कालावधीत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य असून, त्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. इच्छुक महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in
या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही(Ladki).
हेही वाचा :
परीक्षा न देताच रेल्वेत मिळवा जॉब, डिटेल्स एका क्लिकवर..
कपिल शर्मा शो’मध्ये ‘हेराफेरी’च्या बाबुरावला दाखवणं पडलं भारी
रिलासाठी थेट रस्त्याच्या मधोमध गादी टाकून झोपला तरुण Video Viral