बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी की, अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच आई होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर जोर मिळाला आहे(photo). लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरिना आणि अभिनेता विकी कौशल यांचा पहिला बाळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कतरिना गेल्या काही काळापासून लाईनलाईटपासून दूर आहे आणि कोणत्याही इव्हेंट किंवा पार्टीमध्ये दिसत नाही. नुकताच झालेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ च्या प्रमोशनसाठी देखील फक्त विकी कौशल पोहोचला होता.

सोशल मीडियावर कतरिनाचा एक फोटो(photo) तुफान व्हायरल झाला आहे. लाल रंगाच्या गाउनमध्ये तिने बेबी बम्पसह पोझ दिला आहे. फोटो एका रेडिट युजरने पोस्ट केला असून, त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे: “कतरिना कैफचा हा नवीन BTS फोटो पहा, जो जाहिरातीसारखा दिसतो.”
या फोटोमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचा उठाव झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये कतरिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.“कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याचं कळल्यानंतर खूप आनंद झाला.” “कतरिना कैफ हिचं खूप खूप अभिनंदन.” “कोणाची नजर नको लागायला… हाच क्षण वाट पाहत होतो.”

सध्या कतरिना आणि विकी यांनी प्रेग्नेंसीबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु लवकरच दोघे ‘गुड न्यूज’ चाहत्यांसोबत शेअर करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.चाहत्यांसाठी ही एक रोमांचक आणि आनंदाची वेळ आहे, आणि सोशल मीडियावर चर्चेचा गदारोळ सुरूच आहे.
हेही वाचा :
“फ्रॉड आहे शुभमन गिल…” असं का म्हणाले संतप्त चाहते? केलं ट्रोल
छगन भुजबळांचा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांच्यामागे पवार?
रिकाम्या पोटी संत्रीचा ज्यूस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे वाचा, एकदा…