दक्षिण रेल्वेने क्रीडा कोट्याअंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे, जी क्रीडाप्रेमी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरली आहे. या भरतीसाठी अर्ज 13 सप्टेंबर 2025 पासून rrcmas.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाले असून, अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2025 आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही; निवड प्रक्रिया केवळ क्रीडा चाचण्या, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीवर आधारित असेल. महिला, अनुसूचित जाती/जमाती आणि काही इतर श्रेणींना शुल्कात सवलत दिली जाईल.

भरतीसाठी अर्जदारांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय क्रीडा कामगिरी असणे आवश्यक आहे. ॲथलेटिक्स, बॉडी बिल्डिंग, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, पोहणे, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग यासारख्या खेळातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. प्रत्येक स्तरासाठी आवश्यक पात्रता वेगवेगळी असून, लेव्हल 1 साठी 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय पदवी, लेव्हल 2/3 साठी 12वी पास किंवा समतुल्य, आणि लेव्हल 4/5 साठी ग्रॅज्युएशन डिग्री असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असावे.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,000 ते 29,200 रुपये पगार मिळेल, त्यासोबत एचआरए, डीए, वैद्यकीय लाभ आणि पेन्शन यासारखे अनेक भत्तेही दिले जातील. अनुसूचित जाती/जमाती, महिला, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे, तर इतर उमेदवारांसाठी शुल्क 500 रुपये आहे. निवड झाल्यानंतर अनुसूचित जाती/जमाती, महिला, माजी सैनिक आणि दिव्यांगांना संपूर्ण शुल्क परत मिळेल, तर इतर उमेदवारांना 400 रुपये परत मिळतील.

अर्ज प्रक्रिया सोपी असून, उमेदवारांनी rrcmas.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Online Registration For Sports Quota For the Year 2025-26 या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी. नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा. नोंदणी क्रमांकाने लॉगिन करून फॉर्ममध्ये क्रीडा कामगिरी, पदके आणि प्रमाणपत्रे अचूक भरावीत. त्यानंतर लेटेस्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून शुल्क भरा आणि अंतिम फॉर्म सबमिट करून प्रिंटआउट काढा. ही भरती शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळातील कौशल्यावर आधारित असल्याने क्रीडाप्रेमी उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.
हेही वाचा :
कपिल शर्मा शो’मध्ये ‘हेराफेरी’च्या बाबुरावला दाखवणं पडलं भारी
रिलासाठी थेट रस्त्याच्या मधोमध गादी टाकून झोपला तरुण Video Viral
LPG सिलेंडर स्वस्त होणार…..