अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी , लाईक्स, व्ह्यूज मिळावण्याचे लोकांना वेड लागले आहे. यासाठी लोक धोकादायक स्टंट करायला लागले आहे. अलीकडे तर रस्त्यावर रील बनवण्याची एक फॅशन बनत चालली आहे. यामध्ये लोक कधी रस्त्यावर डान्स करत आहेत, तर कधी रस्त्यावर बाईक स्टंट करत आहे(Video). यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या आसपासचा लोकांचा जीव धोक्यात येत आहे. पण लोकांना याची जराही पर्वा राहिलेली नाही.

आता हे पाहा ना, बंगळुरूमध्ये एक तरुण थेट रस्त्याच्या मधोमध गादी टाकून झोपला आहे. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र या तरुणामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झालेली आहे. टोलनाक्याच्या जवळ गाड्यांच्या लाबंच लाबं रागां लागले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर तरुण आरामात गादी टाकून त्यावर पाय पसरुन झोपला आहे. यामुळे वाहचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच सोशल मीडियावर तरुणावर टीका केला जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) @karnatakaportf या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये घटनेची माहिती देण्यात आलेली आहे. अनेकांनी तरुणांच्या या कृतीला बेजबाबदार, बेपर्वा असे म्हटले आहे. लोकांनी संबंधित तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. लोकांच्या मते असे करण्यामागे रिल बनवणे हाच उद्देश आहे. तर काहीजण हे तो जाणूनबुजून करत असल्याचे म्हणत आहे.

यापूर्वी देखील अशा अनेक रिल्स व्हायरल झाल्या होत्या. ज्यामध्ये एक आजोबा रस्त्याच्या मध्ये खुर्ची टाकून आरामात बसले होते, तर एक महिला रस्त्याच्या मधोमध रिल बनवत होती. तसेच काहीजण बाईक स्टंट करत होते. या सर्व गोष्टींमुळे लोक मानसिकदृष्ट्या बिघडले आहेत की, हे सगळं जाणूबुजून केले जात आहे असा प्रश्न निर्माण होतो.

हेही वाचा :

LPG सिलेंडर स्वस्त होणार…..

19 वर्षाच्या तरुणाला सोशल मिडिया बॅन, थेट उच्च न्यायालयाकडून कारवाई

प्रेग्नेंट कतरिना कैफचा पहिला फोटो तुफान व्हायरल….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *