मुंबईत ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स पुन्हा एकदा कायदेशीर वादात अडकला आहे. लोकप्रिय कपिल शर्मा शोमध्ये (Show)‘हेराफेरी’ चित्रपटातील बाबुराव गणपतराव आपटे हे पात्र विना परवानगी वापरल्याबद्दल चित्रपटाचे निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी नेटफ्लिक्सवर २५ कोटी रुपयांची कायदेशीर नोटिस पाठवली आहे.

शोच्या (Show)नवीन प्रोमोमध्ये किकू शारदा बाबुरावच्या भूमिकेत दिसला.अक्षय कुमारची एन्ट्री असलेल्या एपिसोडमध्ये बाबुरावचे पात्र वापरण्यात आले.फिरोज नाडियाडवाला यांनी स्पष्ट केले की, बाबुराव हा फक्त पात्र नाही, तर ‘हेरा फेरी’चा आत्मा आहे, ज्याचा वारसा मेहनत, सर्जनशीलता आणि दीर्घकालीन कामगिरीने बांधला गेला आहे.
पात्राचा वापर विना परवानगी कॉपीराइट आणि ट्रेडमार्क उल्लंघन आहे.‘बाबुराव’ पात्राचा ट्रेडमार्क नाडियाडवाला परिवाराच्या नावावर रजिस्टर्ड आहे.नेटफ्लिक्स आणि शोच्या मेकर्सकडे २५ कोटी रुपयांचा दंड आणि नुकसानभरपाईची मागणी केली गेली आहे.चित्रपटातील पात्रांचा व्यावसायिक वापर केवळ परवानगीनेच करता येतो.

‘बाबुराव’सारखी लोकप्रिय भूमिका चुकीच्या पद्धतीने वापरल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य ठरते.हा वाद नेटफ्लिक्ससाठी मोठा आव्हान ठरू शकतो, आणि कपिल शर्मा शोच्या निर्मात्यांसाठीही कायदेशीर चिंतेचा विषय बनला आहे.
हेही वाचा :
LPG सिलेंडर स्वस्त होणार…..
19 वर्षाच्या तरुणाला सोशल मिडिया बॅन, थेट उच्च न्यायालयाकडून कारवाई
प्रेग्नेंट कतरिना कैफचा पहिला फोटो तुफान व्हायरल….