सोशल मिडियावर(social media) आपल्याला कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे अनेक आश्चर्यकारक आणि आपल्याला थक्क करणारे अजब-गजब व्हिडिओज व्हायरल होत असतात. लोक व्हायरल होण्यासाठी नको नको ते प्रकार करतात आणि असाच एक अनोखा प्रकार आता इथे शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चाॅकलेट खावा तसं जळलेलं लाकूड खाताना दिसून आला आणि मुख्य म्हणजे असं करताना त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःखद भाव नव्हते. मजा घेत घेत तो ते खात होता जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून लोक व्हिडिओला चांगलंच शेअरही करत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य अनेक धाडसी लोकांना चकीत करु शकते. व्हिडिओमध्ये एक माणूस एक अनोखा आणि सर्वांना आश्चर्यचकीत करणारा स्टंट करुन दाखवताना दिसून आला. यावेळी त्याने आपल्या हातात एक जळतं लाकूड पकडलेलं असतं आणि पुढच्याच क्षणी तो त्या लाकडाला तोंडात घालून छान मजा घेत त्याला खाऊ लागतो. यावेळी त्याच्या तोंडातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत जे पाहण खरंतर फार थरारक ठरतं पण तरीही कसलीही पर्वा न करता तो ते जळतं लाकूड आस्वाद घेऊन खायला लागतो. तरुणाचा हा स्टंट पाहून आता यूजर्स मात्र अचंबित झाले आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ @0o__yes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो अग्निदेवाचा नातू आहे, घाबरण्यासारखे काही नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ नरकात जाण्याची तयारी करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मानव ड्रॅगन”(social media).

हेही वाचा :

माझा हात रिकामी, काहीतरी काम द्या…; धनंजय मुंडेंची भर सभेत मागणी

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी…..

अखेर सूरज चव्हाणला भेटली त्याची ‘बच्चा’, 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *