अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या आयफोन(iPhone 17)17 सिरीजने सर्वांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. या लेटेस्ट आयफोननंनतर आता ग्राहकांना लवकरच एक खास सरप्राईज मिळणार आहे.

टेक जायंट कंपनी Apple ने अलीकडेच त्यांची (iPhone 17)नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. शिवाय कंपनीने त्यांची ही नवीन आयफोन सिरीज अनेक अपग्रेडसह लाँच केली आहे. या नवीन आयफोन सिरीजनंतर आता कंपनीच्या फोल्डेबल फोनबाबत चर्चा सुरु झाली आहे. कंपनी त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन कधी लाँच करणार, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून पहिल्या फोल्डेबल आयफोनबाबत चर्चा सुरु आहे.

असं सांगितलं जात आहे की, कंपनी लवकरच त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच करणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कंपनी पुढील वर्षी त्यांची आयफोन 18 सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजसोबत कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच केला जाणार आहे. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनने सांगितलं आहे की, Apple चा पहिला फोल्डेबल फोन असा दिसू शकतो जसं की ते कदाचित दोन टायटॅनियम आयफोन एअर्स एकत्र जोडले आहेत. यामुळे Apple ला पातळ, अधिक आकर्षक फोल्डेबल डिझाइन मिळू शकेल. हे डिव्हाइस केवळ सुधारित टिकाऊपणाच नाही तर एक प्रीमियम फील देखील देईल.

टायटेनियम फ्रेम मिळणार

सॅमसंगसह अनेक स्मार्टफोन ब्रँड्सनी त्यांचे फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. मात्र सध्या काही स्मार्टफोन ब्रँड या सेगमेंटमध्ये प्रचंड ताकदवान झाले आहे. अशा परिस्थितीत, Apple चाहत्यांना हे डिव्हाईस दैनंदिन जीवनात कसे कार्य करेल याबद्दल थोडेसे काळजी वाटते. Apple च्या पहिल्या फोल्डेबल डिवाइसमध्ये iPhone Air सारखी टाइटेनियम फ्रेम आणि स्टेनलेस स्टीलचे कॉम्बिनेशन असू शकते. यामुळे फोनला चांगली ताकद मिळेल, असा कंपनीचा विश्वास आहे.

पहिल्या फोल्डेबल iPhone ची अपेक्षित किंमत

समोर आलेल्या अहवालानुसार असा अंदाज लावला जाऊ शकतो की, पहिल्या फोल्डेबल आयफोनची किंमत 2,000 डॉलरहून जास्त असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हे डिव्हाईस कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात महाग डिव्हाईस असू शकते. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही. त्यामुळे ही सर्व माहिती केवळ समोर आलेल्या रिपोर्टवरून आणि सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवरून देण्यात आली आहे.

फोल्डेबल iPhone चे अपेक्षित स्पेसिफिकेशन

अहवालानुसार असा अंदाज लावला जाऊ शकतो की, पहिल्या फोल्डेबल iPhone मध्ये 5.5 इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जर आतील बाजूस 7.8 इंचाची इनर फोल्डेबल स्क्रीन दिली जाऊ शकते. मिंग-ची कुओ म्हणतात की आतील डिस्प्ले क्रीज-फ्री असण्याची शक्यता आहे आणि तो सॅमसंग डिस्प्लेद्वारे समर्थित असू शकतो. फोटोग्राफीसाठी, फोल्डेबल डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सिंगल फ्रंट कॅमेरा असू शकतो.

हेही वाचा :

Mahindra Bolero खरेदी करायची आहे का?

मागच्या 13 वर्षात ज्या-ज्या वेळी असं झालय,

ब्रेकअपनंतर मलायका आणि अर्जुन कपूर समोरासमोर;


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *