आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (political news) पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कार्यकर्त्यांच्या हालचालींमुळे स्थानिक पातळीवरील समीकरणं बदलताना दिसत आहेत.

महाडमध्ये नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण स्नेहल जगताप यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, हे कार्यकर्ते काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटात दाखल झाले होते. मात्र आता नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा आपली बाजू बदलली आहे.

या प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रमोद महाडिक, व्यापारी प्रवीण चांदोरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत झालेला हा प्रवेश सोहळा शिवसेनेसाठी बळकटी देणारा मानला जात आहे.

दरम्यान, राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे प्रत्येक पक्षाने स्थानिक पातळीवर आपल्या गोटात कार्यकर्त्यांना एकवटण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महाडसारख्या महत्त्वाच्या तालुक्यातील राजकीय उलथापालथीमुळे आगामी निवडणुकांचे चित्र आणखी रंगतदार होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :

Mahindra Bolero खरेदी करायची आहे का?

मागच्या 13 वर्षात ज्या-ज्या वेळी असं झालय,

ब्रेकअपनंतर मलायका आणि अर्जुन कपूर समोरासमोर;

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *