अंतराळाची आवड असलेल्या प्रत्येकाला नासाबद्दल आकर्षण असते. तिथे जाऊन अंतराळातील प्रयोग पाहण्याची अनेकांची इच्छा असते. पण अनेक कारणांमुळे ते शक्य नसतं. आता महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना(students) ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दरवर्षी इस्रो आणि नासा दौऱ्यावर पाठवले जाणार आहे. काय आहे नेमकी ही योजना? याचा कोणत्या विद्यार्थ्यांना होणार फायदा? सविस्तर जाणून घेऊया.

विज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी(students) विज्ञान वारी योजनेअंतर्गत दरवर्षी 51 निवडक विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) भेटीची संधी मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने या योजनेला मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
शालेय शिक्षण विभाग तहसील, जिल्हा आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करतो. तहसील स्तरावरील स्पर्धेतून निवडलेल्या 21 उत्कृष्ट प्रकल्पांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागातील विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा स्तरावरील स्पर्धांमधून 51 सर्वोत्कृष्ट प्रकल्प निवडून त्यांच्या विद्यार्थ्यांना बेंगलूरू येथील भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इसरो) ला भेटीची संधी मिळेल. तर, राज्य स्तरावरील 51 अंतिम विजेत्यांना नासा भेटीचे विशेष बक्षीस देण्यात येईल.
विजेत्यांप्रमाणेच इतर स्पर्धकही मेहनत घेतात. त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान व्हावा, यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती जवळून पाहता येईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलीय.
तहसील आणि जिल्हा स्तरावरील भेटींचा खर्च जिल्हा नियोजन व विकास परिषद (डीपीडीसी) निधीतून केला जाईल. मात्र, नासा भेटीसाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा :
ग्राहकांचे बजेट बिघडणार का? सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा उंचावल्या, खरेदीदारांचे हाल!
आधी गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहासोबत तरुणाने सेल्फी काढला; नंतर….
नागरिकांनो… आधार कार्डसंदर्भात ‘ही’ चूक केल्यास होणार 10 वर्ष तुरुंगवास!