तामिळनाडू राज्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तामिळनाडूच्या तिरूमंगलम येथे असलेल्या एका कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये(hostel) एका विद्यार्थ्याचे रॅगिंग करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला चप्पलने मारहाण देखील करण्यात आली आहे. या कॉलेजमध्ये नेमक काय घडले आहे, ते जाणून घेऊयात.

तमिळनाडू राज्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचे रॅगिंग करण्यात आलं आहे. या प्रकरणात काही वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्याला निर्वस्त्र करून त्याला संपूर्ण हॉस्टेलमध्ये(hostel) फिरवले आहे. या विद्यार्थ्याला चप्पलने देखील मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणात पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांनी तक्रार दिल्यानंतर तीन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत कॉलेज प्रशासनाने हॉस्टेल वॉर्डनला निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थी एका सहकारी विद्यार्थ्याचे कपडे उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्याला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. तसेच पीडित विद्यार्थ्याला चप्पलने मारहाण केली जात आहे. यामध्ये विद्यार्थ्याचे ओरडणे ऐकू येत आहे. यांबाबत त्याच्या आई वडिलांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतो. आरोपी विद्यार्थ्यानी रॅगिंग करण्याच्या उद्देशाने त्याचसोबत अमानवीय व्यवहार केला आहे. पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या [प्रकरणाची गंभीर दखल घेत कॉलेज प्रशासनाने हॉस्टेलच्या वॉर्डनला निलंबित केले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत वॉर्डनचे निलंबन कायम असणार आहे.
हेही वाचा :
फडणवीस सरकारचा या वर्षातला सर्वात मोठा निर्णय! 1339 कोटी रुपये…
युवराज सिंग ईडी चौकशीसाठी पोहोचला, इतर अनेक क्रिकेटपटूंवर देखील असणार नजर
महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का?