लातूर : राज्यभरात मुसळधार पावसाने कहर केला असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक गावं जलमय झाली आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील गुंजर्गा गावात पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेती पूर्णपणे पाण्याखाली(water) गेली आहे.

गुंजर्गा गावातील एका शेतकरी महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती महिला गुडघाभर पाण्यात(water) उभी राहून टाहो फोडताना दिसते. पिके वाहून गेल्यामुळे झालेलं नुकसान आणि उदरनिर्वाहाचे संकट यामुळे या महिलेचे अश्रू अनावर झाले.
पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकरी हवालदिल झाले असून पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. केवळ लातूरच नाही तर औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला जात असून मदतकार्य सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शेतकरी मात्र शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी करत आहेत.
हेही वाचा :
चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्…
महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का?
युवराज सिंग ईडी चौकशीसाठी पोहोचला, इतर अनेक क्रिकेटपटूंवर देखील असणार नजर