पुण्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंगला वेग आला आहे. याच घडामोडींमध्ये, भाजप आता शरद पवार(political) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचा मुलगा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असे म्हटले जात आहे. या संदर्भात सुरेंद्र पठारे यांची भाजपच्या(political) पुण्यातील काही बड्या नेत्यांसोबत विमान नगर परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याचीही माहिती आहे.
या चर्चांवर सुरेंद्र पठारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. याआधी मी १ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा काही लोक करत होते, त्यानंतर ४ तारखेला माझा प्रवेश होईल अशाही चर्चा केल्या. हे दोन मुहूर्त हुलकल्यानंतर आता २२ तारखेला माझा प्रवेश होणार होता, असेही बोलले गेले. मात्र, प्रवेश करायचा असेल तर मला घेऊनच होईल ना? पण मलाच माझ्या प्रवेशाची कल्पना नाही, या केवळ वावड्या आहेत.”
हेही वाचा :
साहिबजादा फरहानचं गोळीबार करत सेलिब्रेशन; अभिषेक शर्मानेही ‘L’ दाखवले
मध्यमवर्गीयांनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; दिवाळीपूर्वी मिळणार तिहेरी भेट!
फडणवीस सरकारचा या वर्षातला सर्वात मोठा निर्णय! 1339 कोटी रुपये…