नाशिक जिल्ह्यात पावसाची विश्रांती…
गोदावरी दारणा नद्यांना विसर्ग सुरु असल्याने पूर्जन्य(rainy) परिस्थिती कायम… निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 20 हजार 544 क्यूसेक पाण्याचा विसर्ग… निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव गावांना फटका बसू नये म्हणून नांदूर मधमेश्वर धरणातून पूर पाण्याचा विसर्ग… आठ वक्राकार गेटद्वारे गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने 20 हजार 544 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू…. आज सकाळी 6 वाजेपर्यंत या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने एकूण 76.89 टीएमसी पूरपाण्याचा विसर्ग…

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरु – कृषीमंत्री भरणे
शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरु आहेत.(rainy) सर्वाधिक पाऊस ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये झाला… त्वरित नुकसान भरपाई कशी मिळेल, यासाठी सरकारचे प्रयत्न… ओला दुष्काळासाठी केंद्र, राज्याच्या निकषाचा विचार सीएम करतील… असं वक्तव्य कृषीमंत्री भरणे यांनी केलं आहे.
ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या विवंचनेतून युवकाची आत्महत्या
परभणीच्या सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील घटना… कुमार नारायण आघाव असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव… लिंबाच्या झाडाला गळफास लावून संपला जीवन… ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत उल्लेख… सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद.
आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने 24 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. गंगापूरसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग मात्र सुरच आहे. गंगापूर धरणातून 4060 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आज देखील नाशिक मध्ये ढगाळ वातावरण कायम आहे. गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी कायम आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्यावर पाणी आलं आहे. गंगापूर धरणातून 4060 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नाशिकमध्ये आज देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा :
इथे आहे देवी ब्रह्मचारिणीच अनोखं मंदिर,
पदरात अडीच वर्षांची मुलगी अन् पतीचं जाणं..;
पाकिस्तान विरुद्ध महागड्या ठरलेल्या बुमराहला आज बसवणार का?