महाराष्ट्रातील राज्य मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदावर(Minister) येण्याची दाट शक्यता आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळे राजीनामा दिलेल्या मुंडेंना आता संधी मिळण्याची चर्चा जोर धरत आहे.

दुसरीकडे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री (Minister)नरहरी झिरवाळ यांना या फेरबदलात ‘आऊट’ होण्याची शक्यता आहे.राज्यात जानेवारी अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आयोजन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तोंडावर प्रभावी नेतृत्व दाखवण्यासाठी या फेरबदलाचा वापर करणार आहे. बीड जिल्हा विचारात घेतल्यास, धनंजय मुंडेंचा या भागात मोठा प्रभाव आहे, ज्यामुळे पक्षाला अधिक जागा मिळवून देण्यास मदत होईल.

मुंडेंनी नुकतीच स्टेजवर बोलताना नेतृत्वाकडे मागणी केली होती – “रिकामं ठेवू नका, काहीतरी काम द्या”. या मागणीला आणि निवडणुकांच्या गरजेला ध्यानात घेऊन त्यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय होऊ शकतो.

अन्य संभाव्य बदल

तानाजी सावंत यांनाही मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

सावंतांसाठी भरत गोगावले यांना मंत्रीपदाचा बळी दिला जाऊ शकतो.

भाजपकडूनही किमान दोन मंत्री बदलले जाणार आहेत, तर दोन कर्तृत्ववान आमदारांना मंत्रिपद दिले जाणार आहे.

राजकीय वर्तुळात सध्या मंत्रिमंडळातील या मोठ्या फेरबदलाची चर्चा जोरदार सुरू आहे, आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

हेही वाचा :

कतरिना कैफ ४२ व्या वर्षी आई होणार…४० नंतर गर्भधारणा शक्य आहे…

WhatsAppच्या नव्या अटींमुळे युजर्स फसले

अतिवृष्टीमुळे डोळ्यांत पाणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पाहणी…..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *