सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी दांडिया खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बोलताना दांडिया (Dandiya)खेळणे म्हणजे हांडगेपणा आणि बुळगेपणा असल्याचे सांगितले. या विधानामुळे कार्यक्रमात आणि समाजामध्ये खळबळ उडाली आहे.

संभाजी भिडे म्हणाले, “गणपती आणि नवरात्र उत्सवाचा अर्थ सण साजरा करणे हा नसून, त्यांचा उद्देश बदलला जात आहे. दांडिया(Dandiya) खेळणे म्हणजे हांडगेपणा, बुळगेपणा आणि नपुंसकत्व तयार करणारा खेळ आहे. हिंदू समाजाने हा खेळ बंद करावा आणि खरी परंपरा टिकवावी,” असे त्यांनी जोरदार टीका करताना म्हंटले आहे.

यावेळी भिडेंनी भारतातील लोकांना निर्लज्ज असे संबोधून भारतीय संविधानावरही टीका केली. ते म्हणाले, “ज्यांना गुलामीची आणि पारतंत्र्याची लाज नाही, तो हा निर्लज्ज लोकांचा देश आहे. संविधान हे नुसते बोलण्याचे साधन ठरले आहे. हिंदू समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा व नवरात्र सणाची खरी परंपरा जपावी,” असेही त्यांनी सांगितले. भेटलेल्या उपस्थितांमध्ये या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली असून, समाजातील विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा :
बोगद्यात भीषण अपघातानंतर कार पेटली, परिसरात धुरांचे लोट
बळीराजाच्या दारात शासन अश्रू पुसले जाणार काय?
‘जो काम करतो ना त्याचीच XX’; अजित पवारांनी पूरग्रस्त शेतकऱ्याला झापलं