नवरात्रीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यात तुम्ही(breakfast) तिखट साबुदाणा खीर बनवू शकता. हा पदार्थ खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो. त्यामुळे कायमच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही साबुदाणा खीर बनवू शकता.

नवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाली (breakfast) आहे. संपूर्ण राज्यभरात नवरात्री सणाचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी देवीचे आगमन करून विधिवत पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. याशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात.
नऊ दिवस मनोभावे उपवास करून देवीची आराधना केली जाते. हा उपवास नवमीच्या दिवशी सोडला जातो. उपवासाच्या दिवशी नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात उपवासाला आहार घेतला जातो. साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर, भगर, थालिपीठ इत्यादी ठराविक पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साबुदाण्याची तिखट खीर बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया साबुदाणा खीर बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
साबुदाणा
बटाटा
हिरवी मिरची
लाल तिखट
मीठ
जिरं
तूप
कृती:
तिखट साबुदाणा खीर बनवण्यासाठी, सर्वप्रथम साबुदाणे स्वच्छ करून काहीवेळ पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या.
कढईमध्ये तूप गरम करून घ्या. गरम तुपात जिरं, मिरची आणि बटाटा टाकून मिक्स करा.
टोपात पाणी गरम करून साबुदाणे शिजण्यासाठी टाका. त्यानंतर त्यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून खीर शिजवून घ्या.
खीर व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात शिजलेल्या बटाट्याची भाजी मिक्स करून पुन्हा एकदा ५ मिनिट शिजवा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली तिखट साबुदाण्याची खीर. यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकू शकता.
हेही वाचा :
नवरात्रीचा पहिलाच दिवस राशींसाठी भाग्यशाली
नवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजांनाना द्या या भक्तिमय शुभेच्छा
3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस!