इंटनेटवर अनेक मजेदार आणि आपलं मनोरंजन करणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात. इथे कधी काय नवीन दिसून येईल ते सांगता येत नाही. मानवांचेच नाही तर प्राणी, पक्षी, मासे असे सर्वच प्रजातीचे व्हिडिओज इथे व्हायरल होत असतात आणि अशातच आता एक नवीन विनोदी व्हिडिओ(video) इथे व्हायरल झाला आहे ज्यात दोन छोटी उंदरं एकमेकांसोबत कुस्ती खेळताना दिसून आले. दोन्ही उंदरांनी एकमेकांना असं धोबीपछाड केलं की पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. इवलेसे प्राणी एकमेकांसोबत लाथा-बुक्क्यांनी कुस्ती लढत आहे हे पाहून सर्वच चकित झाले आणि लोकांनी वेगाने व्हिडिओ शेअर करण्यात सुरुवात केली. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओमध्ये(video) आपण पाहू शकता यात एका ठिकाणी दोन उंदीर एकमेकांसोबत कुस्ती लढताना दिसून आले. त्यांच्या या अनोख्या युद्धाने सोशल मीडियावर मात्र एकच खळबळ उडाली. मुख्य म्हणजे यात दोन्ही उंदरांनी अजिबात हार मानली नाही आणि लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना अक्षरशः जमिनीवर लोळवलं. त्यांची ही जबरदस्त फाईट पाहून युजर्स अचंबित झाले तर काहींनी त्यांच्या या फाईटची चांगलीच मजा लुटली.

अनेक नेटिझन्स त्याची तुलना रस्त्यावरील लढाईशी करत आहेत. या व्हायरल झालेल्या जवळजवळ एक मिनिटाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, दोन्ही उंदीर एका सामान्य स्ट्रीट फायटरप्रमाणे एकमेकांवर हल्ला करताना दिसून आले. ते हवेत उडी मारतात, वार करतात आणि अशा हालचाली करतात ज्या एखाद्या अ‍ॅक्शन चित्रपटातील असल्यासारखे वाटतात. अनेक नेटिझन्सना ते “टीनेज म्युटंट निन्जा टर्टल्स” ची आठवण करून देणारे वाटले.

उंदरांच्या या लढाईचा व्हिडिओ @guptro नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण ते कोणत्या मुद्द्यावरून एवढे भांडत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांच्यात काहीतरी गंभीर झाल्यासारखे वाटते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे मजेदार आहे”.

हेही वाचा :

बोगद्यात भीषण अपघातानंतर कार पेटली, परिसरात धुरांचे लोट

बळीराजाच्या दारात शासन अश्रू पुसले जाणार काय?

‘जो काम करतो ना त्याचीच XX’; अजित पवारांनी पूरग्रस्त शेतकऱ्याला झापलं

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *