स्कंद षष्ठीचे व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या (skanda)सहाव्या दिवशी पाळले जाते. ज्यांना मंगळ दोषाचा त्रास आहे त्यांनी स्कंद षष्ठीच्या दिवशी उपाय करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. स्कंद षष्ठीला कोणते उपाय करायचे, जाणून घ्या

हिंदू धर्मामध्ये स्कंद षष्ठीचा सण भगवान कार्तिकेय यांना (skanda)समर्पित आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी हे व्रत पाळले जाते. हा दिवस केवळ भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र कार्तिकेय यांच्या पूजेसाठीच खास मानला जात नाही तर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे त्यांच्यासाठी देखील हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. मंगळाच्या नकारात्मक प्रभावांना आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासांना दूर करण्यासाठी स्कंद षष्ठीचा दिवस खूप फायदेशीर मानला जातो.
स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी तिथीची सुरुवात 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12.3 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार हे व्रत शनिवार, 27 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्तीला त्याचे फायदे होतात.
स्कंद षष्ठी आणि मंगळ दोष यांच्यातील संबंध काय आहे
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान कार्तिकेय यांना देवांचा सेनापती म्हटले जाते आणि त्यांना मंगळ ग्रहाचे अधिपती देवता मानले जाते. म्हणजेच ज्यांचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असतो अशा व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येतात, वैवाहिक जीवनात संघर्ष होतात, कर्ज आणि आरोग्याशी संबंधित समस्या कायम राहतात. या दिवशी भगवान कार्तिकेयशी विधीनुसार पूजा आणि उपाय केल्याने मंगळाचे दोष शांत होतात आणि जीवनातील त्रास दूर होतो, असे मानले जाते.
मंगळ दोष दूर करण्यासाठी स्कंद षष्ठीला करा हे उपाय
भगवान कार्तिकेय यांची विशेष पूजा
स्कंद षष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर भगवान कार्तिकेयची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. त्यांना लाल फुले, विशेषतः गुलाबाचे फूल अर्पण करा. त्यानंतर पूजेदरम्यान त्यांना कापूर, सिंदूर आणि रोली अर्पण करा. पूजा झाल्यानंतर खीर किंवा मिठाई याचा नैवेद्य दाखवा.
स्कंद षष्ठी स्तोत्राचे पठण
स्कंद षष्ठीच्या दिवशी स्तोत्राचे पठण केल्याने मंगळाच्या दुष्परिणामांपासून सुटका होणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. पूर्ण भक्तीने या स्तोत्राचे पठण केल्याने मंगळामुळे होणारे सर्व दुःख दूर होतात. याशिवाय ओम तत्पुरुषाय विद्महे महासेनया धीमहि तन्नो स्कंधः प्रचोदयात या मंत्रांचा जप करता येऊ शकतो.
या गोष्टींचे करा दान
मंगळ ग्रहाचा रंग लाल असल्यामुळे या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला लाल डाळ, गूळ, तांबे आणि लाल कपडे या गोष्टींचे दान करावे. यामुळे मंगळ शांत होईल आणि अशुभ प्रभाव कमी होईल.
या पद्धतीने करा अभिषेक
गुळ मिसळलेल्या पाण्याने कार्तिकेयेचा अभिषेक करावा. मंगळ दोषामुळे उद्भवणाऱ्या मालमत्तेचे वाद आणि कर्जाच्या समस्या सोडवण्यासाठी हा उपाय करणे खूप उपयुक्त ठरतो.
असे मानले जाते की, स्कंद षष्ठीच्या दिवशी हे उपाय केल्याने दोषामुळे निर्माण होणारे सर्व अडथळे, विशेषतः विवाह आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
हेही वाचा :
वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!
PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी
YouTube वर आले जबरदस्त AI फीचर