फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातील अनेक राज्यांना पावसाने झोडपले आहे.(prediction)अशातच गुजराती ‘बाबा वेंगा’ अर्थात अंबालाल पटेल यांनी केलेली महाभयानक भविष्यवाणी खरी ठरली आहे. अंबालाल पटेल यांनी जसं सांगितलं अगदी तसचं घडलं आणि घडतयं. यामुळे गुजरातमध्ये नवरात्रीच्या उत्सवाचे नियोजन फसले आहे. अनेक ठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे हे कार्यक्रम रद्द झाल्याने आयोजकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये पाऊस पडेल असा इशारा आयएमडीने दिला होता. हे दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे. भारतातील अनेक राज्यांना पावसाने झोडपून काढले आहे. आयएमडीने गुजरातच्या अर्ध्या भागासाठी अलर्ट जारी केला आहे. (prediction)हवामान खात्याने दक्षिण गुजरात, मध्य गुजरात तसेच सौराष्ट्रमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. दक्षिण गुजरातच्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये भरूच, नर्मदा, सुरत, तापी, डांग, नवसारी, दमण, वलसाड, दादरा नगर हवेली जिल्हे समाविष्ट आहेत. आयएमडीने जुनागड आणि गिर सोमनाथसह भावनगर, अमरेली, वडोदरा, छोटा उदयपूर, दाहोद आणि पंचमहलसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, आनंद, खेडा, महिसागर, अरावली, अहमदाबाद, राजकोट आणि बोटाड जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अंबालाल पटेल यांनी साधारण महिन्याभरापूर्वी गुजरातसाठी पावसाचा अलर्ट दिला होता. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरुवात होईल. दसऱ्या पर्यंत हा पावसाचा अलर्ट असले असे अंबालाल पटेल यांनी म्हंटले होते. या पावसाचा गरबा कार्यक्रमांना फटका बसेल अशा इशारा देखील त्यांनी दिला होता. अंबालाल पटेल यांनी पावसाबाबत जसा इशारा दिला होता अगदी तसचं घडलं आहे. गुजरात राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.अंबालाल पटेल हे गुजरातचे बाबा वेंगा म्हणून ओळखले जातात. पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा असो अंबालाल पटेल नेहमीच गुजरातमधील लोकांच्या चर्चेत राहतात. याचे कारण म्हणजे हवामानाबाबातचे त्यांचे अचूक मूल्यांकन. अंबालाल वर्षातील 12 महिने हवामानाचा अंदाज वर्तवतात. गुजरातमधील लोक आणि शेतकरी त्यांच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात.

अंबालाल पटेल यांचे पूर्ण नाव अंबालाल दामोदरदास पटेल आहे. अंबालाल पटेल यांचा जन्म 1 सप्टेंबर 1974 रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील रुदल येथे शेतकरी दामोदरदास पटेल यांच्या पोटी झाला. (prediction)त्यांनी आणंद येथील बीएस कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरमधून कृषी विषयात विज्ञान पदवी प्राप्त केली. 1972 मध्ये ते गुजरात सरकारच्या बीज प्रमाणन एजन्सी, अहमदाबाद येथे बियाणे कृषी पर्यवेक्षक म्हणून रुजू झाले. नंतर त्यांना कृषी कार्यालयात बढती देण्यात आली, जिथे त्यांनी सहाय्यक कृषी संचालक पदही भूषवले. बियाणे पर्यवेक्षक म्हणून पदार्पण करण्याव्यतिरिक्त, त्यांनी सेक्टर 15 मधील कृषी प्रयोगशाळा गुणवत्ता नियंत्रण कार्यालय आणि माती चाचणी जैविक नियंत्रण कार्यालयातही काम केले. ते सप्टेंबर 2005 मध्ये निवृत्त झाले.

हेही वाचा :

कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी, 

भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *