2025 ते 2030 या पुढील पाच वर्षांत काय घडेल? हे आपण सांगू शकत नाही.(testing)अभ्यासक, तज्ज्ञ हे अंदाज वर्तवू शकतात. पण भविष्याच्या उदरात काय घडतंय याची जन्मजात उत्सुकता आपल्या मनात उपजतच असते. नास्त्रेदमस असो वा बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या उगाच जगात प्रसिद्ध नाहीत. हेच नाही तर आपल्या आजुबाजूला ही काही लोक दैवी शक्ती असल्याचा दावा करत भाकीतं करतात. काही ज्योतिषी भविष्यातील गणितं मांडतात. बाबा वेंगा यांचा मृत्यू 1996 मध्ये झाला होता. पण त्यांच्या गूढ भविष्यवाण्याची चर्चा आणि क्रेझ आजही कायम आहे.

जनरेश झेड म्हणजे सोशल मीडियाद्वारे मनातील भावना, चिंता, प्रेम, अभिव्यक्ती, चीड, खदखद याला मोकळं वाहू देणारी पिढी आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा शस्त्र म्हणून ही पिढी वापर करते.(testing) श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, केनिया आणि इतर देशात या तरुण पिढी आडून एखादी तिसरीच शक्ती तिचं इप्सित साध्य करताना दिसते. जगात अजून जेन झेडची क्रांती संपलेली नाही. आशिया, आफ्रिकाच नाही तर युरोपातील काही देशातही तरुण पिढी क्रांती करण्याचे भाकीत व्यक्त करण्यात येत आहे.

पुढील पाच वर्षात जगात काय घडेल?

2025 – युरोपमध्ये मोठा संघर्ष उफाळून येईल. सध्या युरोपियन देशात धुसफूस दिसत आहे. भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागेल. मानवाच्या अधोगतीला सुरुवात होईल.

2026 – हे वर्ष मानवजातीसाठी घातक असेल. 2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल. जगातील बड्या राष्ट्रांमध्ये तणाव शिगेला पोहचेल. चीन, तैवानला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल. पण त्याला यश येणार नाही. पुढील वर्षी रशिया आणि अमेरिकेत थेट संघर्ष होऊन तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल.

2027 – यावर्षी पुन्हा कोरोनासारखा विषाणू मानव जातीला वेठीस धरेल. या काळात जैविक आणि रासायनिक युद्ध भडकण्याची भीती बाबा वेंगानं व्यक्त केली आहे.

2028 – मानव जातीसाठी हे नवीन वर्षे मोठ्या शोधाचे कारण ठरेल. मानवजातीला ऊर्जेचा नवीन स्त्रोत सापडेल. या स्वच्छ आणि शक्तिशाली इंधनामुळे अतिवेगाने अगदी काही दिवसांत, तासात इतर ग्रहांवर जाण्याचा मार्ग मोकळा होईल. शुक्र ग्रहापर्यंत मानव सहज ये-जा करेल. तर अंतराळ दूरपर्यंत त्याची पोहच होईल.

2029- या काळात Gen Z ही पिढी अधिक सक्षम झालेली असेल. (testing)केवळ सत्ता उलथवण्यापूरतं हे आंदोलन मर्यादित राहणार नाही. संपूर्ण जगाच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेलाच ही पिढी मोठा धक्का देईल. जुन्या व्यवस्था नष्ट होतील. धर्माचे थोतांड, दैववादावर मोठा प्रहार होईल. नवीन व्यवस्था निर्माण होईल.

हेही वाचा :

तोंडाला सुटेल पाणी!

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *