कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. (demand)कोल्हापुरातील दाभोकर कॉर्नर चौक परिसरात तृतीपंथी व्यक्तीनं गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. संबंधित तृतीयपंथी व्यक्ती जबरदस्तीने पैसे मागत होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला रोखले. मात्र, पोलिसांच्या या कारवाईचा राग मनात धरून त्या तृतीयपंथी व्यक्तीनं पोलिसांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली.कोल्हापुरात पोलीस आणि तृतीयपंथीमध्ये तुंबळ हाणामारीचा प्रकार समोर आला आहे.

ही घटना कोल्हापुरातल्या दाभोळकर कॉर्नर चौक परिसरातून उघडकीस आली.तृतीयपंथी या परिसरात जबरदस्तीने पैसे मागत होती. यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.(demand)पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी संबंधित तृतीयपंथीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तृतीयपंथीयाला राग अनावर झाला.
तृतीयपंथी व्यक्तीनं पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली.(demand)या घटनेत पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. घटनेनंतर संबंधित तृतीयपंथी व्यक्तीला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी,
भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!