पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम पीसीओएस हा प्रजनन वयोगटातील महिलांमध्ये (PCOS)आढळणारा सर्वाधिक सामान्य हार्मोनल विकार आहे. याबाबत अनेक चुकीच्या समजुती पसरलेल्या आहेत. चुकीची माहिती व जागरूकतेच्या अभावी महिलांना वेळीच निदान व उपचारात घेण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे या समस्येची वास्तविकता जाणून घेणं गरजेचं आहे अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.पुण्यातील मदरहूड हॉस्पिटल्समधील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी सांगितलं की, पीसीओएसमध्ये अंडाशयातून सामान्यपेक्षा अधिक प्रमाणात पुरुष हार्मोन्स अँड्रोजेन तयार होतात. त्यामुळे ओव्हुलेशन अनियमित होतं आणि सिस्ट तयार होतात. हार्मोनल असंतुलन, अनुवांशिकता, तणाल, लठ्ठपणा आणि निष्क्रिय जीवनशैली ही याची प्रमुख कारणं आहेत. अनियमित मासिक पाळी, पुरळ, चेहऱ्यावर आणि शरीरावर अनावश्यक केस, वजन वाढणं, वंध्यत्वाचा धोका अशी लक्षणं दिसून येतात.


केवळ जास्त वजनाच्या महिलांनाच पीसीओएस होतो हे चुकीचे आहे. सडपातळ महिलांनाही हा त्रास होऊ शकतो.पीसीओएस म्हणजे वंध्यत्व हा एक गैरसमज आहे. योग्य उपचार व जीवनशैलीत बदल करून अनेक महिला यशस्वीपणे मातृत्वाचा आनंद घेता येतो.अनियमित मासिक पाळी हेच एक लक्षण वास्तविक पाहता चेहऱ्यावर मुरुम येणे, केस गळणे, मूड स्विंग्ज, त्वचेवरील काळपटपणा अशी अनेक लक्षणे दिसतात.(PCOS)ही केवळ प्रजनन समस्या आहे : प्रत्यक्षात पीसीओएसमुळे मधुमेह, हृदयविकार तसेच मानसिक त्रास वाढतो. 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनचा त्रास होतोय? वाचा काय आहेत यामागची कारणंपीसीओएस कायमचा बरा होतो तो पूर्णपणे बरा न होता अचुक व्यवस्थापनाने नियंत्रणात ठेवता येतो. गर्भनिरोधक गोळ्या हाच एकमेव उपाय आहे : जीवनशैलीत बदल, वजन नियंत्रणात ठेवणे, ताण कमी करणे व औषधोपचार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही प्रत्यक्षात अनेक पीसीओएसमुंले (PCOS)नैराश्य, चिंता व आत्मविश्वास कमी होण्याचा अनुभव येतो.हा केवळ प्रौढांचा आजार आहे किशोरवयीन मुलींमध्येही हा आजार आढळतो, परंतु बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते.आहारातील योग्य बदल व नियमित व्यायाम हे पीसीओएस पासून दूर राखण्यास मदत करते. केवळ ५ ते १० टक्के वजन कमी केले तरी मासिक पाळी नियमित होते, ओव्हुलेशन सुधारते आणि दीर्घकालीन गुंतागुंत कमी होते.पहिल्या पिरीयड्स नंतरचा ‘तो’ टप्पा…! मुलीच्या विचारसरणीपासून जीवनशैलीपर्यंत होणारे मोठे बदल महिलांनी स्वतःच्या शरीरातील बदल गांभीर्याने घ्यावेत, मासिक पाळीच्या चक्राकडे लक्ष द्यावे आणि तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. वेळीच निदान आणि योग्य व्यवस्थापन केल्यास केवळ प्रजननच समस्याच नाही तर तर एकूण आरोग्य व जीवनमान सुधारते.

हेही वाचा :

तोंडाला सुटेल पाणी!

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *