आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. (microwave)अन्न लवकर गरम करणे असो, केक किंवा कुकीज बेक करण्यासाठी तर मायक्रोवेव्ह तर वापरतोच. पण इतरही पदार्थ जसं की एखादी भाजी असेल किंवा डाळ असेल. कोणतीही पदार्थ असो तो झटपट गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरतातच. कारण तो पदार्थ गरम करायला वेळ कमी लागतो आणि मेहनत कमी लागते.पण असे म्हटले जाते की मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे बरेच लोक मायक्रोवेव्ह वापरणे टाळतात. कारण असं म्हटलं जातं की, मायक्रोवेव्ह रेडिएशन अन्नाची रचना बदलते, ज्यामुळे ते कर्करोगाचे कारण बनते. अनेकांचा असाही विश्वास आहे की मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात. या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे हे जाणून घेण्यासाठी, पोषणतज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.

पोषणतज्ञ म्हणतात की मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने कर्करोग होतो ही एक मिथक आहे. खरं तर, मायक्रोवेव्हमध्ये वस्तू गरम करण्यासाठी नॉन-आयनीकरण किरणोत्सर्गाचा वापर केला जातो, जे एक्स-रे आणि यूव्ही किरणांप्रमाणे डीएनए बदलू शकत नाहीत. त्याचपद्धतीने ते अन्नाची रचनाही खराब करत नाहीत, म्हणून त्यामुळे कर्करोग होऊ शकतात हा दावा केवळ अफवा असल्याचं म्हटलं जातं.(microwave)बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न टाळतात कारण त्यांना वाटते की ते त्यातील पोषक तत्वांचा नाश करते. पोषणतज्ज्ञ म्हणतात की हे देखील एक मिथक आहे. खरं तर, असंख्य अभ्यासातून असे दिसून आले आहे की मायक्रोवेव्ह हे अन्न पुन्हा गरम करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण ते अन्नातील फक्त पाणी गरम करतात, ज्यामुळे त्याचे पोषक तत्व टिकून राहतात.

पोषणतज्ज्ञ म्हणतात की मायक्रोवेव्हचा खरा धोका प्लास्टिकच्या कंटेनर वापरल्याने होतो. गरम केल्यावर, ते बीपीए, फॅथलेट्स आणि इतर विविध विषारी पदार्थ बाहेर टाकतात, जे तुमचे हार्मोनल संतुलन बिघडू शकतात. शिवाय, ते इतर अनेक आरोग्य समस्या देखील निर्माण करू शकतात. (microwave)पोषणतज्ञ म्हणतात की बाजारात उपलब्ध असलेले मायक्रोवेव्ह-सुरक्षित प्लास्टिक कंटेनर देखील कालांतराने विषारी पदार्थ बाहेर टाकतात. म्हणून, नेहमी मायक्रोवेव्हसाठी काचेचे कंटेनर वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते.

हेही वाचा :

तोंडाला सुटेल पाणी!

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *